Animal Husbandry : पशुपालनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरणार

Technology In Animal Husbandry : पशुपालन व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आगामी काळात वाढणार आहे. या तंत्रज्ञानामुळे तांत्रिक माहिती थेट मोबाईलवर मिळणार आहे.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘पशुपालन व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आगामी काळात वाढणार आहे. या तंत्रज्ञानामुळे तांत्रिक माहिती थेट मोबाईलवर मिळणार आहे. त्यामुळे दूध उत्पादकास त्याचा लाभ होईल,’’ असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी मांडले.

कास्ट कासम प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) आणि देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे ‘पशूधन व्यवस्थापनात माहिती तंत्रज्ञानाचा (आयओटी) भारतीय परिस्थितीतील वापर’या विषयावर शुक्रवारी (ता.३) आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्‌घाटन प्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा होते.

Animal Husbandry
Animal Husbandry : पशुपालनासाठी महिला शेतकरी सरसावल्या

डॉ. पाटील म्हणाले,‘‘पशुपालनामध्ये सर्वसाधारपणे नोंदी नियमित न ठेवल्या जाणे, आरोग्य तपासणीमध्ये माहितीचा अभाव, चारा तसेच पशुखाद्याची पुरेशी माहिती नसणे, कुशल कामगारांचा अभाव, वातावरणातील होणारे विविध बदल याची तांत्रिक माहिती नसल्याने पशुपालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

यावर मात करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे.’’ श्री. मुंदडा यांनी गोसंगोपन, गोसंवर्धन, गो-संरक्षण, गोमूल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षण आणि गोआधारित शेतीबाबत आपले विचार मांडले.

Animal Husbandry
Animal Husbandry : कमीत कमी भांडवलात बक्कळ कमाई देणारे शेती सलग्न व्यवसाय

या प्रसंगी बाएफ संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत काकडे, विशाल वशिष्ठ, व्ही. एस. श्रीधर, अभयसिंह जगताप, श्रीकृष्ण मुळे आणि शैलेश मदने यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सुनील कदम यांनी कास्ट कासम प्रकल्पात सुरू असलेल्या संशोधनाविषयी माहिती दिली.

कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर यांनी स्वागत केले. डॉ. धीरज कणखरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com