Calf Diseases : वासरांमधील रोटा विषाणू हगवणीची कारणे, उपाय

Calf Rotavirus infection : उन्हाळ्यात लहान नवजात वासरे आणि प्रौढ आजारी जनावरांमध्ये विषाणू, जिवाणू, बुरशी किंवा परजीवी आजारांचा सर्वात जास्त धोका असतो. यापैकीच वासरांमधील रोटा विषाणू हगवण हा एक महत्त्वाचा आजार आहे.
Newsborn Calf
Newsborn CalfAgrowon
Published on
Updated on

Protect Your Cattle from Summer Diseases

Animal Care : उन्हाळ्यात लहान नवजात वासरे आणि प्रौढ आजारी जनावरांमध्ये विषाणू, जिवाणू, बुरशी किंवा परजीवी आजारांचा सर्वात जास्त धोका असतो. यापैकीच वासरांमधील रोटा विषाणू हगवण हा एक महत्त्वाचा आजार आहे. वासरांमध्ये रोटा विषाणू हगवण हा आजार जानेवारी ते जून या काळात जास्त प्रमाणात दिसतो.

कोंबड्यांमध्ये फाउल कॉलरा म्हणजेच पटकी हा रोग जिवाणूद्वारे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. जिवाणूचा संसर्ग झाल्यानंतर बाधित कोंबडीमध्ये रक्तदोष म्हणजेच सेप्टीसेमिया होऊन कोंबड्या मरतात. ब्रॉयलर आणि लेअर अशा दोन्ही कोंबड्यांना फाउल कॉलरा रोग होतो. कमी वयाच्या कोंबड्यांपेक्षा जास्त वयाच्या कोंबड्यांमध्ये या रोगाची तीव्रता जास्त असते.

Newsborn Calf
Diarrhea in Newborns Calf : नवजात वासरांमधील अतिसार लक्षणे, उपचार

नवजात वासरांमध्ये आणि काही प्रमाणात मोठ्या वयाच्या जनावरांमध्येही रोटा विषाणू हगवण आजार दिसून येतो. हा पचनसंस्थेशी संबंधीत आजार आहे. एक ते दोन महिन्यांच्या वासरांपासून तीन वर्षांच्या वासरांमध्ये या विषाणूचा धोका असतो. चार आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांमध्ये हा आजार आढळतो.  

आजाराची लक्षणे

फाउल कॉलरा या रोगाच्या जिवाणूचा संसर्ग झाल्यानंतर पाच ते आठ दिवसात काही कोंबड्यांमध्ये लक्षणे दिसतात. तिव्र प्रकारात बाधित कोंबडी कोणतीही लक्षणे न दाखविता सहा ते बारा तासांत दगावते. आणि कोंबड्यांतील मरतुकीचे प्रमाण वाढत जाते. फार कमी कोंबड्या आजाराची लक्षणे दाखवितात. यामध्ये सुरवातीला हिरवट रंगाचा अतिसार दिसून येतो. नैराश्य, विस्कटलेले पंख, फुफ्फुस दाह, आणि जलद श्वसन यासारखी ही लक्षणे दिसतात. तर सौम्य प्रकारात कोंबडीच्या शरीरावर सूज येते. डोळ्यांच्या त्वचेचा आणि कंठाचा दाह होतो. डोळ्यांतून अश्रू गळतात. डोळे, तुरे आणि कल्ले सुजतात. ते निळसर काळे पडतात आणि बाधित कोंबड्या लंगडतात.

लक्षणे

हा आजार वासरांना विविध संसर्गांमधून होतो. हगवण ओळखताना पहिल्यांदा  जनावराचे वय लक्षात घ्यावे.लहान नवजात वासरांमध्ये अतिसार होण्याचे सर्वांत सामान्य कारण म्हणजे रोटा विषाणू संसर्ग.गाई, म्हशींच्या दुसऱ्या ते तिसऱ्या महिन्याच्या वासरांमध्ये हा आजार आढळून येतो.चार आठवड्यांखालील जनावरांमध्ये आजाराचे प्रमाण कमी असते.  

आजाराचा प्रादुर्भाव झाल्यापासून दोन ते तीन दिवसांनंतर वासरांमध्ये लक्षणे दिसू लागतात.  वासराची भूक मंदावते, अतिसार किंवा हागवणीला सुरुवात होते. हगवण पांढरट पिवळ्या रंगांची असते. अपचनामुळे हगवणीमध्ये दुधाचे अंश दिसतात. आतड्यावरील सुजेमुळे अन्नाचे पचन होत नाही. चिकट हागवणीमुळे शेपटी, मागील पाय हे अतिसाराने माखतात. क्षार,पाण्याचे शरीरातील संतुलन बिघडते. अशा परिस्थितीमध्ये वासरे दगावण्याचे प्रमाण वाढते. शरीरातल्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे वासराचे वजन कमी होते. भूक मंदावते, बाधित वासरे शांत, निस्तेज दिसतात. आतड्यांवरील सुजेमुळे पोटदुखी होते. वासरांची नजर पोटाकडे असते.  

Newsborn Calf
Livestock Census : राज्यात पशुगणना ७७ टक्क्यांवर

आता पाहुया या रोगाचा प्रसार कसा होतो  

गोठ्यातील अस्वच्छता हे या आजाराच्या संसर्गाचे मुख्य कारण आहे. जन्मतः हा आजार वासरात आढळून येत नाही. गोठ्यातील संसर्ग झालेल्या वस्तू, दावण, गव्हाणी मार्फत या रोगाचा प्रसार होतो. य़ाशिवाय गोठ्यातील सांडपाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, गोठ्यातील अस्वच्छता, निर्जंतुकीकरणाचा आभाव, गोठ्यातील अपुरी जागा आणि सूर्यप्रकाशाचा अभाव या कारणामुळे आजार पसरण्याच प्रमाण वाढत जात.   

उपाययोजना काय आहेत

या आजारावर ठोस उपाय नाही. तज्ज्ञ पशुवैद्याकडून वासरांमधील लक्षणावर उपचार करून आजाराचा धोका कमी करता येतो. जिवाणूवर प्रतिजैविकांचा योग्य वापर करून वासरांना वाचवता येते. रोग झालेल्या वासराला निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.  गोठ्यातील जमीन, गव्हाण, भिंती, फरशी स्वच्छ झाडून गरम पाण्याने धुऊन कोरडी करावी. शेणाचे डाग, वाळलेले शेण खरवडून काढावे आणि झाडून घ्यावे. त्यानंतर १ टक्का फॉर्मॅलिनचे द्रावण किंवा २ टक्के फिनॉलचे द्रावण बनवून ते संपूर्ण गोठ्यात फवारावे.

निर्जंतुकीकरणानंतर १५ मिनिटांनी पुन्हा एकदा गरम पाण्याने संपूर्ण परिसर धुऊन कोरडा केल्यानंतर जनावरे गोठ्यात घ्यावीत.गोठ्यात मुबलक सूर्यप्रकाश असावा. हवा खेळती राहाण्यासाठी उपाय करावेत. बाधित जनावरांच्या जागेभोवती चुनखडी भुकटी टाकावी. पोटॅशिअम परमॅग्नेटचे ०.१ टक्का द्रावण करून परिसराचे निर्जंतुकीकरण करावे. अशा प्रकारचे उपाय केले तर या आजारावर नियंत्रण मिळवता येते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com