Diarrhea in Newborns Calf : नवजात वासरांमधील अतिसार लक्षणे, उपचार

Newsborn Calf : नवजात वासरांची प्रतिकारशक्ती कमी असल्याकारणाने ते बऱ्याच संसर्गजन्य आजाराने त्रस्त असतात. प्रामुख्याने जुलाब किंवा अतिसार या आजारांचा प्रादुर्भाव जास्त होतो.
Newsborn Calf
Newsborn CalfAgrowon
Published on
Updated on

डॉ. विवेक संगेकर, डॉ. संतोष स्वामी

Animal Care : नवजात वासरांची प्रतिकारशक्ती कमी असल्याकारणाने ते बऱ्याच संसर्गजन्य आजाराने त्रस्त असतात. प्रामुख्याने जुलाब किंवा अतिसार या आजारांचा प्रादुर्भाव जास्त होतो. हा नवजात वासरांमध्ये होणारा अत्यंत महत्त्वाचा आजार असून, वासरू जन्मल्यानंतर पहिल्या १ ते ४ आठवड्यांत या आजाराची लागण जास्त होते.

अतिसार या आजाराची लागण वयाने मोठ्या असणाऱ्या वासरांमध्येही आढळून येते. मात्र त्याचा धोका नवजात वासरांमध्ये अधिक असतो. या आजाराची लागण झाल्यास नवजात वासरू पातळ विष्ठा शरीराबाहेर विसर्जित करते. त्यामुळे वासरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (निर्जलीकरण) होऊन वासरे अशक्त होतात. त्यांची हालचाल मंदावते व ते सुस्त होऊन एकाजागी बसून राहतात. काही वासरे सतत आडवे झोपून राहतात. वेळीच या आजाराकडे लक्ष न दिल्यास वासरांमध्ये मरतुक होण्याची शक्यता असते.

Newsborn Calf
Calf Management : नवजात वासरांचे आहार व्यवस्थापन

कारणे :
- जिवाणू, विषाणू आणि परजीवी यांचे संक्रमण.
- व्यायल्यानंतर पहिले तीन दिवसांचे दूध (चीक) वेळेवर न मिळणे किंवा अपुऱ्या प्रमाणात मिळणे.
- आहारामध्ये पोषणतत्त्वांची कमतरता.
- मिल्क रिप्लेसरमध्ये प्रोटीन, फॅट किंवा इतर आवश्यक पोषणतत्त्वांचा अभाव.
- चारा व पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था.
- आहारात अचानक होणारा बदल.
- दूषित पाणी किंवा चाऱ्याचे सेवन.
- थंडी, उष्णता आणि आर्द्रता यासारख्या पर्यावरणीय घटकांमध्ये समतोलाचा अभाव.
- जास्त थंड आणि उष्ण वातावरणामुळे वासरांचे शरीर कमकुवत होऊन संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढते.
- चयापचन संबंधित बिघाड, श्‍वसनाचे आजार आणि नाभीचे संसर्ग वासरांच्या आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे वासराची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जुलाब किंवा अतिसाराचा प्रादुर्भाव वाढतो.

लक्षणे :
- पातळ, पाण्यासारखी किंवा चिकट विष्ठा शरीराबाहेर विसर्जित करणे.
- हळूहळू पातळ विष्ठेचे रक्तयुक्त विष्ठेमध्ये रूपांतर होते.
- पातळ आणि रक्तयुक्त विष्ठेमुळे गोठ्यात दुर्गंधी पसरते.
- विष्ठेचा रंग पांढरा, पिवळसर, हिरवट किंवा रक्तमिश्रित असतो.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (निर्जलीकरण) होते.
- त्वचा कोरडी पडते आणि त्वचेवर सुरकुत्या पडतात.
- डोळे खोलगट गेलेले दिसतात.
- भूक मंदावते.

- दूध पिण्याची इच्छा कमी होते.
- दूध पिऊनही वासरांच्या शरीरात ऊर्जेचा अभाव जाणवतो.
- वासरांची वाढ खुंटते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
- वजन कमी होते.
- शरीरामध्ये सुस्तपणा जाणवतो.
- वासरांच्या हालचाली मंदावतात.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन वासरे कोमामध्ये जातात. गंभीर अवस्थेत मृत्यू होण्याचा धोका असतो.

निदान :
- विष्ठा पाणीदार, रक्तमिश्रित, किंवा दुर्गंधीयुक्त असणे.
- शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा जाणवणे. त्वचा कोरडी होणे आणि डोळे खोलगट जाणे या लक्षणांच्या आधारे वासरांमध्ये जुलाब किंवा अतिसाराच्या स्वरूपाचे निदान करता येते.
- आंतर परजीवीच्या निदानासाठी विष्ठेची चाचणी करणे.
- संसर्गजन्य रोगांच्या निदानासाठी रक्त तपासणी करणे.

उपचार, प्रतिबंधात्मक उपाय :
- वासरू जन्मल्यानंतर पहिल्या १ ते २ तासांमध्ये त्याला आईचे दूध (कोलोस्ट्रम) द्यावे.
- वासराला त्याच्या शारीरिक वजनाच्या १० टक्के प्रमाणात कोलोस्ट्रम (चीक) द्यावे.
- प्रमाणाबाहेर कोलोस्ट्रम (चीक) देणे टाळावे.
- वासरांच्या आहारामध्ये योग्य मिल्क रिपलेसरचा समावेश करावा.
- वासरांचा आहार हा संतुलित आणि सुलभ पचणारा असावा.
- पशुवैद्यकाच्या मदतीने वासराला इलेक्ट्रोलाइट्स आणि नॉर्मल सलाइन द्यावी. जेणेकरून त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण राखता येते.
- पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आवश्यक ते उपचार करावे.
- गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवावा.
- वासरांच्या गोठ्यातील घाण, ओलसरपणा आणि दुर्गंधी साफ करावी
- आजारी वासरांना निरोगी वासरांपासून वेगळे करणे.
- वासरांना नियमित जंतनाशक औषधे द्यावीत.

-डॉ. विवेक संगेकर, ९०७५८८९४९०
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com