Animal Ultra Sonography : जनावरांतील अचूक निदानासाठी अल्ट्रासोनोग्राफी तंत्र

Animal Care : अल्ट्रासोनोग्राफी यंत्रामुळे अचूक निदान होते. या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही प्रकारची हानी पशुतज्ज्ञ तसेच जनावरांना होत नाही.
Animal Ultra Sonography
Animal Ultra Sonography Agrowon
Published on
Updated on

Ultra Sonography in cattle : साधारणपणे गाई, म्हशीमध्ये वर्षाला एक वेत ही संकल्पना प्रत्यक्ष पशुपालकाच्या गोठ्यामध्ये राबविणे आवश्यक आहे.

गाई, म्हैस व्यायल्यानंतर साधारणपणे ६० ते ८० दिवसात माजावर येणे अपेक्षित आहे, परंतु तसे काही प्रमाणातच होते. यामुळे भाकडकाळ जास्त दिवसाचा होतो आणि दुग्धव्यवसायात तोटा सहन करावा लागतो.

भाकडकाळाचा कालावधी जास्त असण्यामागे महत्त्वाची दोन कारणे म्हणजेच माजावर न येणे आणि माजावर आली तर वारंवार उलटणे. याबाबत निदान करण्यासाठी गाई, म्हशींच्या तपासणीसाठी अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञान फायदेशीर ठरणारे आहे.

अल्ट्रासोनोग्राफी यंत्रामुळे अचूक निदान होते. या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही प्रकारची हानी पशुतज्ज्ञ तसेच जनावरांना होत नाही.

पारंपारिक पद्धतीत पशु प्रजनन क्षमता व गाभण जनावरांचा परीक्षण करण्याकरिता गर्भाशयाची हाताने चाचणी, योनी मार्गातील स्त्रावाच परीक्षण आणि योनी परीक्षण इत्यादी पद्धतीचा वापर केला जात असे. मात्र १९९० पासून अल्ट्रासाउंड ही पशु प्रजनन परीक्षणाची आधुनिक पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.

या पद्धतीमध्ये जनावराच्या प्रजनन अंगावर विशिष्ट वारंवारतेच्या ध्वनी लहरींचा मारा करून त्याची प्रतिमा पडद्यावरती उमटवली जाते. तज्ञांकडून या प्रतिमांचा अभ्यास करून विविध रोगांच निदान केलं जातं.

Animal Ultra Sonography
Animal Care : जनावरांतील खरुज, आसडी वर सोपे उपाय काय आहेत?

अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञान वापरण्यास सोपं आहे. या तंत्राने अचूक निदान होते. अल्ट्रासोनोग्राफी तंत्र जनावरास कोणतीही भूल अथवा इजा न करता वापरता येते. महत्त्वाचं म्हणजे या लहरीचा धोका वापरणाऱ्याला तसेच जनावराला होत नाही.

अशा अनेक फायद्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर विकसित देशांमध्ये पशु प्रजनन व्यवस्थापनासाठी दैनंदिन स्तरावर होत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून जनावरांच्या प्रजनन संस्थेच्या प्रत्येक अवयवाची म्हणजेच गर्भाशय बीजकोश, गर्भाशयमुख यांची सखोल तपासणी करणं शक्य आहे. अल्ट्रासोनोग्राफीमुळे अचूक गर्भधारणा तपासणी करता येते.

Animal Ultra Sonography
Animal Heat Stroke : जनावरांतील उष्माघाताची कारणे काय आहेत?

या पद्धतीचा वापर करून अल्ट्रा सोनोग्राफी पुढील तपासण्या करता येतात. गाभण तपासणी सामान्यतः गर्भाची चाचणी करून तज्ञ दोन महिन्याच्या गाभण जनावराची निदान करू शकतात.

या पद्धतीद्वारे कमीत कमी २५ दिवसाची गाभण तपासणी करता येते. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च आणि मौल्यवान वेळ ही वाचतो.

लहान वासरांमधील गर्भ तपासणी

पूर्वी लहान वासरांमध्ये गाभण तपासणी हे पशुवैद्यकांसाठी खूप अवघड काम होते. पण या तंत्रज्ञानाचा वापर करून लहान जनावरांमधील गाभण तपासणी, गर्भसंख्या, जनावरांचा गाभणकाळ व विण्याची अपेक्षित तारीख अचूकरित्या वर्तविता येते. या पद्धतीने गर्भाच्या शरीराचे विशिष्ट मोजमाप करून गर्भाचे वय तपासता येते.

------------

पशूसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com