
उन्हाळ्यातील (summer) तीव्रता जशी वाढत जाते, तसा चाऱ्याचा (fodder) प्रश्न गंभीर बनत जातो. शेळीपालन प्रामुख्याने मांस (chevon) उत्पादनासाठी केले जाते. अधिकाधिक मांसाचे उत्पन्न हवे असल्यास शेळ्यांचे संगोपन व्यवस्थित झाले पाहिजे. शेळीला गरीबाची गाय (poor man cow)असे संबोधले जाते. कारण शेळी झाडपाला, टाकाऊ पदार्थ खाऊन स्वतःचे पालनपोषण करत असते.
रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये शेळी आकाराने सर्वात छोटा प्राणी आहे. शेळी शेतातील गवत, पिकांचे स्टबल, झाडांच्या वाळलेल्या किंवा ओल्या शेंगा किंवा झाडांच्या साली खाऊन स्वतःचे पोट भरत असते. या खाल्लेया चाऱ्याचे दुधात आणि मांसात रूपांतर करते, याव्यतिरिक्त उत्तम लेंडीखतही देते.
शेळ्या झाडपाला खुप आवडीने खातात. झाडाच्या पाल्यामध्ये खनिजांचे आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने शेळीला आवश्यक ती पोषणमुल्ये सहज मिळतात.
बाभुळ- बाभळीची झाडे सर्वत्र आढळून येतात. रस्त्याच्या कडेला, जंगलात या झाडांच्या शेंगा आणि पाने मुबलक प्रमाणात मिळतात. बाभळीचे झाड साधारणपणे १५ ते १८ मीटर उंच वाढते. या झाडांची वाढ लवकर होते. क्षारयुक्त जमिनीतही बाभळीची वाढ जोमाने होत असते. या झाडाची पाने आणि शेंगा शेळ्या आवडीने खातात. मुक्त शेळीपालनासाठी बाभळीचा चारा आणि शेंगा एक चांगला पर्याय आहे.
पिंपळ- पिंपळाची पाने टोकदार असतात. या झाडांची पाने शेळ्या आवडीने खातात.
सुबाभुळ- हे झाड कमी पाण्यात तग धरून चाऱ्याची उपलब्धता करून देते. यांच्या शेंगा लुसलुशीत असल्याने, शेंगाचा शेळ्यांच्या खुराकात वापर होऊ शकतो. शेळ्यांच्या आहारात सुबाभूळीचा वापर करताना ४० टक्क्यापर्यंत करावा. जास्त प्रमाणात केल्यास मिमोसीन घटकामुळे शेळ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
चिंच- चिंचेचे झाड तर आपणा सर्वाना माहित असेलच, जास्त उष्णतेच्या भागात, तग धरून राहणारे हे झाड आहे. चिंचेची आंबट पाने शेळ्या मोठ्या आवडीने खातात.
अंजन – अंजनाची झाडे सर्वत्र आढळून येतात. विविध प्रकारच्या मातीत अंजनाची वाढ चांगली होते. शेळ्यांसाठी या झाडाचा पाला उत्कृष्ट असतो. कमी पाण्यावर तग धरून अंजनाची वाढ चांगली होते.
खैर- खैराची झाडे पाण्याचे प्रमाण कमी असलेल्या दुष्काळी भागात, डोंगर उतरावर, शेताच्या बांधावर सर्वत्र आढळतात. सदैव हिरवेगार असणारे हे झाड उंच वाढते. यांच्या पानांची रचना समोरासमोर असून आकाराने ती बाभळीच्या पानासारखी असते.
बोर- बोराचे झाड सर्वांच्या परिचयाचे असून या झाडाची पाने, शेळ्यांचे उत्तम खाद्य आहे.
शेवगा- शेवग्याचा पाला तर शेळ्या आवडीने खातात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.