शेळी पालनाचे विविध प्रकार कोणते?

शेळी पालन हा एक चांगला आणि फायदेशीर व्यवसाय आहे. शेळी पालनाचे मुख्यतः तीन प्रकार आहेत. यामध्ये परंपरागत, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त पद्धत या तीन पद्धती येतात.
What are different methods of goat rearing?
What are different methods of goat rearing?

शेळी पालन हा एक चांगला आणि फायदेशीर व्यवसाय आहे.  शेळी पालनाचे मुख्यतः  तीन प्रकार आहेत.  यामध्ये परंपरागत, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त पद्धत या तीन पद्धती येतात.

परंपरागत पद्धत (traditional method)–

आपल्या राज्यात याच पद्धतीने शेळीपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. परंपरागत पद्धतीमध्ये शेळ्यांना चरण्यासाठी मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी लावलेला असतो. गुराखी दिवसभर शेळ्यांना शेताच्या बांधांवर आणि कुरणांमध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घालण्याची गरज पडत नाही. ह्या प्रकारच्या पद्धतीमध्ये चारा-पाण्यावर जास्त खर्च होत नाही.

बंदिस्त पद्धत(Intensive methods)

बंदिस्त शेळी पालनामध्ये शेळ्यांना पूर्ण दिवस २४  तास शेडमध्ये बांधून ठेवले जाते. यामध्ये खर्च अधिक होतो. यासाठी एक चांगली जागा, वेगळ्या शेडची आवश्यकता असते. यामध्ये शेळ्यांना चारा व्यवस्थापन,  त्यांचे औषधोपचार, लसीकरण यांसारखे खर्च येतात.

हेही पाहा- बोअर शेळी संगोपनाकडे वाढता कल

अर्धबंदिस्त पद्धत (Semi-intensive methods) ज्या शेतकऱ्यांना पूर्ण बंदिस्त शेळीपालन पद्धतीचा वापर शक्य नाही तसेच पूर्ण मोकाट शेळीपालनही शक्य नाही अशा शेतकऱ्यासाठी अर्धबंदिस्त शेळीपालन फायदेशीर ठरते. त्यामध्ये अर्धा वेळ शेळ्या ठाणबंद केल्या जातात आणि अर्धा वेळ चरायला सोडल्या जातात. या पद्धतीला अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणतात.

पुर्ण मोकाट किंवा अर्धबंदिस्त शेळी पालनासाठी कुरणांची गरज असते. परंतु सध्या कुरणे कमी होत चालली आहेत. मोकाट शेळी पालनामध्ये आंतरप्रजनन होत असते. त्यामुळे शेळीचा दर्जा घसरतो. पण बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण प्रजननावर नियंत्रण ठेवू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com