Bajara Fodder Crop : हिरव्या चाऱ्यासाठी बाजरी ची लागवड कशी करावी?

Team Agrowon

बाजरी  चा चारा

बाजरी  चा चारा अत्यंत पौष्टिक आहे. यामध्ये २ ते ३ टक्के प्रथिने, ३६ टक्के तंतुमय पदार्थ असतात. तर १ ते ३ टक्के क्षाराचे प्रमाण असते. 

Bajara Fodder Crop | Agrowon

या चारा पिकात ऑक्झालिक आम्लाचे प्रमाण हे कमी असून ते सुरक्षित आहे. नेपियर गवताबरोबर बाजरी पिकाचा संकर करून जास्त उत्पादन देणारे संकरीत हायब्रिड नेपियर हे चारा पीक तयार केले आहे.  

Bajara Fodder Crop | Agrowon

जमीन

या पिकाला कोणत्याही प्रकारची जमीन चालते. परंतु हे पीक हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत चांगले येते. पिकाची चांगली उगवण होण्यासाठी वाफे तयार करावेत. ढेकळे, धसकटे, गवत काढून वाफे समतल प्रमाणात केलेले असावेत.

Bajara Fodder Crop | Agrowon

जातींची निवड

हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे लागते.खरीप हंगामात पाभरीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी. पेरणीसाठी बाजरीच्या पुसा मोती,  मोती बाजरा, जायंट बाजरा, एचबी- १, एचबी - २ या जातींची निवड करावी. 

Bajara Fodder Crop | Agrowon

खतमात्रा

लागवडीपुर्वी शेणखत मिसळून द्यावे. प्रति हेक्टरी ८० किलो नत्र, ४०  किलो स्फुरद द्यावे. नत्राची मात्रा दोन हप्त्यात विभागून द्यावी. म्हणजेच ५० किलो नत्र पेरणीच्या वेळी व राहिलेले ३० किलो नत्र हे पहिल्या कापणीनंतर द्यावे.

Bajara Fodder Crop | Agrowon

पाणी व्यवस्थापन

पिकाला गरजेनुसार १ ते २ पाण्याच्या पाळ्या आवश्यकतेनुसार द्याव्यात. पेरणीनंतर ३० दिवसांमध्ये पिकामध्ये १ ते २  कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. 

Bajara Fodder Crop | Agrowon

पाहिली कापणी

पीक ५५ ते ६० दिवसांचे झाल्यानंतर पाहिली कापणी करावी. पुढच्या कापण्या ३५ ते ४० दिवसांनी कराव्यात. 

Bajara Fodder Crop | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Narendra Modi | Agrowon
आणखी पाहा...