Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Chicken Poultry Care : ग्रामीण भागात उपजीविकेमध्ये कुक्कुटपालन हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय आहे. हवामानातील बदलाचे परिणाम कुक्कुटपालन क्षेत्रामध्येही दिसत आहेत.
Poultry Management
Poultry ManagementAgrowon

डॉ. मुकुंद कदम, डॉ. दर्शना भैसारे, डॉ.अर्चना कदम

Poultry Farming : ग्रामीण भागात उपजीविकेमध्ये कुक्कुटपालन हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय आहे. हवामानातील बदलाचे परिणाम कुक्कुटपालन क्षेत्रामध्येही दिसत आहेत. या बदलांमुळे अंडी, चिकन उत्पादनावर परिणाम होत आहे. कुक्कुटपालनात सर्वाधिक खर्च हा खाद्यावर होतो. हे खाद्य मका, सोयाबीनपासून तयार केले जाते. हवामानातील बदलामुळे अनेक ठिकाणी मका व सोयाबीन उत्पादनात घट येत आहे.

तयार झालेल्या उत्पादनाची गुणवत्ता चांगली राहत नाही. आर्द्रतेमुळे मक्यामध्ये ॲफ्लाटॉक्सिनची निर्मिती होते. वाढत्या दरामुळे कुक्कुटपालनातील खर्च वाढला आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक पोल्ट्री फार्म उन्हाळ्यात बंद ठेवले जातात. त्यामुळे पोल्ट्री शेडच्या जवळ जल संधारण, पाणी पुनर्भरणाच्या उपाययोजना आवश्यक झाल्या आहेत.

Poultry Management
Poultry Management : कोंबड्यांना प्रोटिनचा पुरवठा करणारे खाद्य

वाढत्या तापमानाचा परिणाम

हवामान बदलामुळे तापमान वाढले आहे, उन्हाळा अधिक काळ लांबला आहे. वाढीव तापमानामुळे कोंबड्यांमधील मरतुकीचे प्रमाण वाढले आहे. पोल्ट्री शेडमध्ये तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर गेले, की कोंबड्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे होते. शेडमधील तापमान कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे ठरते.

अचानक होणाऱ्या हवामान बदलामुळे आजूबाजूच्या वातावरणात बदल होतो. त्याचा कमी अधिक प्रमाणात कोंबड्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. दरवर्षी कोंबड्यांना काही विशिष्ट आजार ठराविक वातावरणात होतात, अचानक होणाऱ्या हवामान बदलामुळे विषाणू, जिवाणू सक्रिय होतात.

Poultry Management
Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

अनेक वेळा हवामान बदलामुळे वातावरणातील आर्द्रता वाढते. कोंबड्यांच्या आरोग्यासाठी अधिक तापमान व अधिक आर्द्रता जास्त घातक ठरते. अनेक खासगी कंपन्या हवामानातील बदलामुळे वातानुकूलित शेड बांधणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहेत.

कोंबड्यांच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. तसेच जैवसुरक्षा देखील महत्त्वाची ठरते.

बदलत्या हवामानात कोंबड्याच्या आनुवंशिकतेमध्ये बदल करून काही विशिष्ट जाती निर्माण करता येऊ शकतात का, याबाबत संशोधन सुरू आहे. नेकेड नेक व फ्रिझल जीनचा उपयोग, कोंबड्यांच्या ब्रीडिंग प्लॅनमध्ये बदल, उष्णकटिबंधीय हवामान सहन करू शकणारे जनुकीयदृष्ट्या सुधारित कोंबड्यांच्या जातीचे प्रजनन करणे हे बदलत्या हवामानाच्या टप्प्यात अतिशय महत्त्वाचे आहे. उष्णता सहन करणाऱ्या जाती विकसित कराव्या लागणार आहेत. याचबरोबरीने रोगप्रतिकारक, वाढीचा चांगला दर आणि उत्पादन सुधारणे हा बदलत्या हवामानाचा परिणाम कमी करण्याचा एक मार्ग आहे.

मोबाइलमधून वेगवेगळ्या अॅपवर हवामानाचा अंदाज दिला जातो. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करावा.

डॉ. मुकुंद कदम, ८८८८८३६३७४

(प्राध्यापक व विभाग प्रमुख, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशू वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com