Team Agrowon
शरीर, पेशींच्या वाढीसाठी, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी, शरीरात एंझाईम आणि हॉर्मोन्स तयार होण्यासाठी, रक्तात वेगवेगळ्या क्रियांसाठी प्रथिनांची गरज असते.
सोयाबीन डीओसी, तेल विरहित शेंगदाणा ढेप, सरकी ढेपेमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक (१८ टक्यांपेक्षा जास्त) असते.
कडधान्यांमध्ये सुमारे आठ ते बारा टक्के आणि द्विदल धान्यांमध्ये तीस ते चाळीस टक्के प्रथिने असतात. खाद्यामध्ये वनस्पतिजन्य प्रथिने आणि प्राणिजन्य प्रथिनांचा समावेश करावा.
बहुतेक ठिकाणे सोयाबीन डीओसी वापरला जाते. कारण ते बाजारात सहज आणि कमी दरात उपलब्ध असते. सोयाबीनमध्ये ४५ ते ४९ टक्के प्रोटीन असते.
खाद्य तयार करताना थेट सोयाबीन वापरू नयेत. कारण त्यात काही विषारी पदार्थ असतात. आपण सोयाबीन डीओसी(तेलविरहित सोयाबीन पेंड) हे खाद्यात मुख्यत: वापरतो.
शेंगदाणा पेंड आपण वापरू शकतो, यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बुरशी लवकर लागते. त्यामुळे शेंगदाणा पेंडीचे प्रमाण कमी ठेवावे.
मासळीची भुकटी, मीट मील, ब्लड मिल यांचा वापर करू शकतो. यांच्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अतिशय चांगले असते.