Poultry Feed : निकृष्ट दर्जाच्या खाद्याचा पोल्ट्री व्यावसायिकांना पुरवठा

Poultry Farming : राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांना निकृष्ट दर्जाच्या कुक्कुटखाद्याच्या पुरवठ्याचा फटका बसत आहे. यामुळे करार केलेल्या कंपन्यांबाबत मुळशीसह जिल्ह्यात कुक्कुटपालकांकडून संताप व्यक्त होत आहे.
Use of medicinal plant in poultry feed
Use of medicinal plant in poultry feedAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांना निकृष्ट दर्जाच्या कुक्कुटखाद्याच्या पुरवठ्याचा फटका बसत आहे. यामुळे करार केलेल्या कंपन्यांबाबत मुळशीसह जिल्ह्यात कुक्कुटपालकांकडून संताप व्यक्त होत आहे. कंपन्यांनी त्वरित दखल घेतल्यास पोल्ट्रीधारक पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा कुक्कुटपालक आणि महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेने दिला आहे.

कुक्कुट खाद्याच्या पिशव्यांवर अन्नघटकांचे प्रमाण न छापल्यास संबंधित उत्पादक कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचे लेखी आदेश केंद्र आणि राज्य शासनाने राज्य पशुसंवर्धन विभागाला वारंवार दिलेले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी या आदेशांना राज्य प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली गेली आहे. त्यामुळे राज्यातील पशुसंवर्धन विभाग हा कंपनी संवर्धन झालाय की काय अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Use of medicinal plant in poultry feed
Poultry Industry : पोल्ट्रीतील बड्या करारदार कंपनीने गाशा गुंडाळला

सरकारने २२ जुलै २०२४ रोजी कुक्कुट खाद्याच्या बॅगांवर अन्न घटकांचे प्रमाण न छापल्यास संबंधित कंपन्यावर कडक कारवाई करण्याबाबत परिपत्रक काढलेले होते. त्यानुसार, राज्य पशुसंवर्धन आयुक्तांनी त्याबाबतच्या लेखी सूचना राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या सर्व प्रादेशिक सहआयुक्त, जिल्हा उपायुक्त तसेच जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

मात्र, गेले चार महिने उलटून गेले तरीही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे राज्यातील नऊ लाखांहून अधिक पशुपालकांकडून पशुसंवर्धन विभागाबाबत नाराजी व संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॅा. प्रवीणकुमार देवरे तसेच सहआयुक्त डॅा. प्रशांत भड यांचेशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

Use of medicinal plant in poultry feed
Poultry Industry : कर्नाटक, आंध्र प्रदेशातील कोंबड्यांवर बंदी घालण्याची मागणी

‘पशुसंवर्धन विभागाकडून कारवाई नाही’

खाद्याच्या पिशवीवर उत्पादक संस्थेचे नाव, पत्ता, कुक्कुट खाद्य उत्पादनाची तारीख, बॅच क्रमांक, उत्पादन वापरण्याचा अंतिम तारिक (बेस्ट बिफोर यूज), निव्वळ वजन, विपणन कंपनीचे नाव व पत्ता, कुक्कुट खाद्यात पशुजन्य घटक असल्यास त्याचा उल्लेख आदी स्वरूपाच्या बाबी नमूद करणे बंधनकारक आहे. मात्र पशुसंवर्धन विभागाने त्यावर अद्याप कारवाई केलेली नाही, असे कुक्कुटपालक व महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे कार्याध्यक्ष शरद गोडांबे यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार एक सुद्धा कंपनी रजिस्टर करारनामा करत नाही. जो करारनामा कंपन्या करतात तो एकतर्फी असतो व शंभर अथवा पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर साधी नोटरी केली जाते . त्यामध्ये मोठी आर्थिक फसवणूक शेतकऱ्यांची होत. त्यामुळे राज्यातील सर्व पोल्ट्रीधारक पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत.
- शरद गोडांबे, कार्याध्यक्ष, कुक्कुटपालक व महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com