निव्वळ कोरडा चाराही ठरतो जनावरांना घातक !

दुधाळ किंवा गाभण गायी-म्हशींचे संगोपन केवळ वाळलेल्या चाऱ्यावर केल्यास जनावरे मृदूअस्थी या आजाराला बळी पडतात.
Sulfer deficiency in animals
Sulfer deficiency in animalsAgrowon
Published on: 
Updated on: 

दुधाळ किंवा गाभण गायी-म्हशींचे संगोपन केवळ वाळलेल्या चाऱ्यावर केल्यास जनावरे मृदूअस्थी या आजाराला बळी पडतात. प्रामुख्याने म्हशींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येते. उन्हाळ्यात चारा टंचाईच्या काळात या आजाराचे प्रमाण अधिक असते.

ग्रामीण भागात या आजराला 'उरमोडी' असे संबोधले जाते. या आजाराचा प्रादुर्भाव एप्रिल ते जुल दरम्यान दिसून येतो. साधारणपणे दुभती जनावरे (milking animals) विल्यानंतर ६ ते ८ महिन्यांनी या आजाराची बाधा झालेली दिसून येते. गायींच्या तुलनेत म्हशींमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असते.

Sulfer deficiency in animals
जनावरांना का द्यावा हायड्रोपोनिक चारा?

कारणे
- आपल्या राज्यात प्रामुख्याने चराऊ जमिनीत स्फुरदचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून आले आहे.जमिनीत स्फुरदची कमतरता असल्यास, चाऱ्यात सुद्धा हे प्रमाण कमी राहते. चाऱ्यातून म्हशींना स्फुरदचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही.
- जनावरांच्या आहारात कोरड्या चाऱ्याबरोबर हिरवा चारा, पशुखाद्य, क्षार-मिश्रणाचा अभाव किंवा कमी प्रमाणात समावेश असल्यास. प्रामुख्याने उन्हाळ्यात जनावरांचे संगोपन फक्त कोरड्या चाऱ्यावर केल्यास, या आजाराची बाधा होते.
- शारीरिक अवस्थेनुसार तसेच शरीराच्या वाढत्या गरजेनुसार स्फुरद न मिळाल्याने जनावरांना या आजाराची बाधा होते.
- सर्वसाधारणपणे एका लिटर दुधात १ ग्रॅम स्फुरद वापरले जाते. यासाठी आहारातून प्रतिलीटर दुधामागे २ ग्रम अधिक स्फुरद पुरविले पाहिजे.

Sulfer deficiency in animals
चारा पिकांची राणी - लसून घास

लक्षणे

- जनावर खंगत जाते.

- दूध उत्पादनात घट होते.

- जनावर आखडून व हळूवार चालते.

- जनावराची पाठ वाकडी होते.

- जनावर उठताना अत्यंत हळूवार हलकेच उठते.

- जनावर उठताना बराच वेळ गुडघ्यावर थांबून राहते.

- वेळीच उपचार न केल्यास, जनावर आडवे पडून राहते आणि शेवटी मृत्युमुखी पडते.

प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार

- हिरव्या चाऱ्यात स्फुरदचे प्रमाण कोरड्या चाऱ्याच्या तीन पट अधिक असते. याउलट पशुखाद्यात हेच प्रमाण सहा पटीने अधिक असते. त्यामुळे आहारात त्यांना हिरव्या चाऱ्याचा समावेश करावा.
- आजारी गायी-म्हशींना १५ ते ३० दिवस नियमितपणे १०० ते १२५ ग्रॅम खनिज मिश्रण दिल्यास त्या पूर्णपणे निरोगी होऊ शकतात.
- दुधाळ गायी–म्हशीच्या दूध उत्पादनाच्या प्रमाणात प्रती २.५ ते ३ लिटर दुधामागे एक किलो तर गाभण जनावरांना गाभणकाळाच्या शेवटच्या २ महिन्यात दीड किलो जादा खुराक द्यावा.
- दुधाळ व गाभण गायी-म्हशींच्याआहारात रोज किमान ५० ग्रॅम क्षार मिश्रणे द्यावीत.

आहारात स्फुरदाची कमतरता असल्यास किंवा जास्त दूध देणाऱ्या जनावरांत दुधाद्वारे स्फुरद जास्त प्रमाणात बाहेर जात असेल तर रक्तातील स्फुरदचे प्रमाण व दूध उत्पादन कायम ठेवण्यासाठी हाडातील स्फुरद शोषून घेतले जाते. परिणामी हाडे ठिसूळ होतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com