चारा पिकांची राणी - लसून घास

जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्याचे अनेक विविध प्रकार आणि प्रजाती आहे. लसूण घास तुम्हाला माहित असेलच त्याला इंग्रजीमध्ये लुसर्न गवत असे म्हणतात.
Lucerne is called as king of fodder crops.
Lucerne is called as king of fodder crops.
Published on
Updated on

आपल्या गोठ्यात विविध वयोगटातील जनावरे असतात. या सर्व जनावरांच्या पालन-पोषणासाठी चाऱ्याची सोय करावी लागते. जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्याचे अनेक विविध प्रकार आणि प्रजाती आहे. लसूण घास तुम्हाला माहित असेलच त्याला इंग्रजीमध्ये लुसर्न गवत असे म्हणतात.

लसूण घासाचे पिक हे वर्षभर हिरवा चारा (Green Fodder) पुरविणारे पिक म्हणून ओळखले जाते. लसूण घासला चारा पिकांचा राजा म्हणून ओळखले जाते. हा लसूण घास (Lucern) दिसायला मेथी सारखा असतो.

हेही पाहा- चारा कापण्याची योग्य वेळ जाणून घ्या 

लसूण घास हे द्विदलवर्गीय पीक असून त्याची उंची ६० ते ९० सें.मी. पर्यंत वाढते. या चारा पिकात जीवनसत्त्व अ आणि ड, प्रथिने व खनिजे (Minerals) भरपूर प्रमाणात असतात. १८ ते २० % प्रथिने, २५ % तंतुमय पदार्थ असतात. योग्य व्यवस्थापन केल्यास वर्षभर भरपूर, सकस हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. लसूण घास दुभत्या (Milking) जनावरांना खाण्यास दिल्याने दुधाच्या प्रमाणात वाढ दिसून येते. सोबतच स्निग्धांशांच्या प्रमाणातही वाढ होते.

लसूण घासच्या सिरसा-९, ल्युसर्न-९, आनंद-२, आनंद-३, आनंद-८ यांसारख्या अनेक सुधारित जाती उपलब्ध आहेत. या गवताच्या लागवडीसाठी काळी, कसदार जमीन, पाण्याचा निचरा होणारी सुपीक जमीन लागते. मुरमाड, चुनखडीयुक्त जमीन शक्यतो टाळावी. लसूण घासला १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी तर हिवाळ्यात १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे.

लुसर्न घासचे एकरी ८ ते १० किलो बियाणे लागते. पहिली कापणी ५० ते ५५ दिवसानंतर करावी. पहिल्या कापणीत ९०० ते १२०० किलोचे उत्पादन मिळते. पुढील कापण्यामध्ये हे उत्पादन वाढून २०००० ते २२००० किलोपर्यंत मिळते. एकरी साधारणतः ४५००० किलोचे उत्पादन मिळत असते. या बहुवार्षिक पिकापासून दर वर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com