
Nagpur News : राज्यात मांसल आणि लेअर पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठण करण्यात आले. या समितीच्या चार बैठकाही झाल्या; त्यातील मुद्दे शासनाकडे पाठविण्यात आले. परंतु, त्यावर कोणताच निर्णय होत नसल्याने या बैठका म्हणजे निव्वळ फार्स ठरल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिकांनी केला आहे.
राज्यात करारदार आणि वैयक्तिक स्तरावर पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांची संख्या ९ लाखांच्या घरात आहे. त्यांच्या माध्यमातून लेअर आणि ब्रॉयलर पशुपालन होते. गेल्या काही वर्षांत करारदार कंपन्यांकडून नियमात सातत्याने बदल होत आहे. त्याचा आर्थिक फटका पशुपालकांना बसत आहे.
त्यातूनच राज्यात तीन पोल्ट्री व्यावसायिकांनी आत्महत्याही केल्या. त्या पार्श्वभूमीवर पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रश्न समजून घेत त्यांच्या सोडवणुकीसाठी समितीचे गठण करावे, अशी मागणी होत होती.
पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यानुसार समितीचे गठण केले. समितीच्या चार बैठकांही झाल्या. परंतु प्रश्न ‘जैसे थे’ असल्याने या समितीचा उपयोग काय, असा प्रश्न समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे.
...अशा आहेत मागण्या
नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटीकडून अंड्यांचे दर कंपन्यांच्या दबावाखाली जाहीर होतात. त्याला पर्याय म्हणून महाराष्ट्र एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटीचे गठण करावे.
- कंत्राटी पद्धतीने कुक्कुटपालन करताना कंपन्या नोटरी करतात. करारनाम्याची ही प्रत शेतकऱ्यांना देखील मिळावी.
- शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश व्हावा.
- पोल्ट्रीला शेती मानत वीज आकारणी दर कृषिपंपांच्या धर्तीवर असावा. शेडला शेतीच मानत ग्रामपंचायतीकडून कर आकारणी करू नये.
- तेलंगणाच्या धर्तीवर मदतीसाठी धोरण ठरविण्यासाठी तज्ज्ञांचा अभ्यास गट तयार करावा.
- नैसर्गिक आपत्तीच्या काळात झालेल्या नुकसानीची भरपाई राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत समाविष्ट करून मिळावी.
समितीची रचना अशी...
जगदीश गुप्ता (पशुसंवर्धन विभाग, प्रधान सचिव), सचिन्द्र प्रताप सिंग (आयुक्त, पशुसंवर्धन विभाग), तर सदस्यांमध्ये डॉ. शीतल मुकणे, डॉ. नयना देशपांडे, डॉ. प्रशांत भड, डॉ. जयंत माहोरे, संगीता देसाई, पंढरीनाथ सावळे, डॉ. कुमार ए. ई, डॉ. योगेश खटावकर, शुभम महाले, अनिल खामकर, प्रियांका थिगळे, कुणाल पाथळे, डॉ. अजय देशपांडे, विठ्ठल चौधरी, डॉ. संजय पाध्ये, सुदर्शन पोकाळे, धनंजय अहेर, एकनाथ मुंगसे, जगदीश पाटील, बबन पवार.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.