खिल्लार बैलजोडीची साडेतीन लाखांना विक्री

बाजार समितीच्या आवारात एका तरुण शेतकऱ्याने तब्बल साडेतीन लाख रुपयांना बैलजोडी खरेदी करून सर्जा-राजावरील आपले प्रेम अधोरेखित केले. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा बैलजोडी खरेदीसाठी साडेतीन लाखांची बोली लागली.
Khilar Bull
Khilar BullAgrowon
Published on
Updated on

नामपूर, जि. नाशिक : आधुनिक तंत्रज्ञानामुळे (Modern Agriculture) शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणात यांत्रिक अवजारांचा (Machinery Use In Agriculture) वापर वाढल्याने शेतकऱ्यांकडे असणारे पशुधन (Livestock) दिवसेंदिवस घटत चालल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. अशा परिस्थितीत येथील बाजार समितीच्या आवारात एका तरुण शेतकऱ्याने तब्बल साडेतीन लाख रुपयांना बैलजोडी (Khilar Bullock) खरेदी करून सर्जा-राजावरील आपले प्रेम अधोरेखित केले. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा बैलजोडी खरेदीसाठी साडेतीन लाखांची बोली लागली.

Khilar Bull
रात्रीत वधारला खिलार बैलांचा भाव

१९७५ पासून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येथे उपबाजार आवार कार्यान्वित असल्यापासून जिल्ह्यातील वैभवशाली परंपरा असलेला बैल बाजार हे येथील वैशिष्ट्ये आहे. दर बुधवारी बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या बैल बाजारात शेकडो जनावरे विक्रीसाठी येतात. नगर जिल्ह्यातील बैल व्यापारी कर्नाटक राज्यातून बैलांची खरेदी करून परिसरातील शेतकऱ्यांना बैलांची सेवा पुरवतात. विशेष बाब म्हणजे अनेक व्यापारी शेतकऱ्यांना उधारीवर व्यवहार करतात. शेतकऱ्यांकडून टप्प्याटप्प्याने वसुली करत असतात.

Khilar Bull
खिलार बैलांच्या मागणीत वाढ

यंदा मोसम खोऱ्यात वरुण राजाची मेहेरबानी असल्याने शेतशिवार फुलली असून येथील जनावरांचा बाजारही बहरला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आणली जात आहेत. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने येथील बाजारात जनावरांचे भाव वधारले आहेत. उत्तम प्रतीच्या बैलजोडीला लाख रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळत आहे. गाळणे (ता. मालेगाव) येथील चंद्रकांत सोनवणे गाळणेकर या बैल व्यापाऱ्याकडून पाडगण (ता. कळवण) येथील विष्णू बागुल तरुण शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाची खिल्लार जातीची बैलजोडीची बुधवारी (ता. १७) खरेदी केली.

बैलांच्या खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ही बैलजोडी पाहण्यासाठी, शेतकरी प्रेमाचे दृश्य मोबाइलमध्ये टिपण्यासाठी, फोटो, व्हिडिओ काढणाऱ्यांची बाजार समितीच्या आवारात मोठी झुंबड उडाली होती. बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे, उपसभापती लक्ष्मण पवार, सचिव संतोष गायकवाड, उपसचिव अरुण अहिरे आदींच्या हस्ते बैलजोडी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचा बाजार समितीकडून सत्कार करण्यात आला. यानंतर वाजतगाजत बैलांची मिरवणूक काढण्यात आली.

बाजार समितीच्या आवारात गेल्या ४८ वर्षांपासून भरणाऱ्या बैलबाजारामुळे मोसम खोऱ्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय झाली आहे. शेती व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या बैलजोडीच्या किमती गगनाला भिडल्या असल्या तरी शेतकऱ्यांचे सर्जा-राजावरील प्रेम मात्र कायम आहे. येथील बाजार समितीत बैल व्यापाऱ्यांना चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यासाठी बाजार समिती प्रशासन कटिबद्ध आहे.

- कृष्णा भामरे, सभापती, नामपूर बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com