Goat Farming : "ठाणबंद गोठे आणि शेळीपालनात होणारा बदल: 'राष्ट्रीय पशुधन मोहिमे'च्या योजनेचे योगदान"

National Livestock Mission : केंद्र सरकारने २०२१-२२ पासून ‘राष्ट्रीय पशुधन मोहिमे’ अंतर्गत शेळ्या आणि मेंढ्यांच्या ठाणबंद गोठ्यांसाठी अनुदान देणे सुरू केले आहे, ज्यामुळे विविध राज्यांमध्ये गोठे स्थापन झाले आहेत.
Goat Farming
Goat Farming SchemeAgrowon
Published on
Updated on

Goat Rearing : काही प्रमाणात शेळ्या, मेंढ्यांचे ठाणबंद स्वरूपातील गोठे आता दिसू लागले आहेत. पण त्यांचे प्रमाण अजूनही बरेच कमी आहे. ‘राष्ट्रीय पशुधन मोहिमे’द्वारे केंद्र सरकार शेळ्या, मेंढ्यांच्या मोठ्या गोठ्यांना २०२१-२२ पासून मोठ्या प्रमाणावर अर्थसाह्य देत आहे. उद्योजकता विकास, रोजगार निर्मिती, कौशल्याधारित प्रशिक्षण, शेळ्या, मेंढ्यांच्या जातींची आनुवंशिक सुधारणा करून त्यांच्या उत्पादकतेत वाढ, मटण, दूध, लोकर व चारा उत्पादनात वाढ, चारा प्रक्रियेला उत्तेजन अशी बरीच उद्दिष्टे योजनेची आहेत.

१०० माद्या आणि ५ नर ते ५०० माद्या आणि २५ नर अशा गोठ्यांना या योजनेतून भांडवली खर्चाच्या ५० टक्के अनुदान (१० लाखांपासून ते ५० लाख रुपयापर्यंत) दिले जाते. आतापर्यंत या योजनेच्या माध्यामातून १३६० फार्म वेगवेगळ्या राज्यांत स्थापन झाले आहेत. त्यातील ४९९ कर्नाटकात, २५६ तेलंगणात, १९७ मध्य प्रदेशमध्ये आणि ८३ महाराष्ट्रात आहेत. परंतु अशा प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधून संबंधित क्षेत्राची सर्वांगीण प्रगती किती होते आणि आनुवंशिक सुधारणेसारखी उत्कृष्ट पण कष्टसाध्य उद्दिष्टे कितपत साध्य होतात, त्याची माहिती अजून तरी उपलब्ध नाही.

उस्मानाबादी शेळी संशोधन व विकास प्रकल्प

निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या (नारी) पशुसंवर्धन विभागातर्फे उस्मानाबादी शेळीचे मटण व दुधाच्या उत्पादकता वाढीसाठी एक संशोधन व विकास प्रकल्प गेली पंधरा वर्षे सुरू आहे. त्याला भारतीय कृषी संशोधन परिषदेचे मार्गदर्शन आणि अर्थसाह्य आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांमधील प्रत्येकी दोन-तीन गावांमधील शेळ्यांचे दूध, त्यांच्या करडांची वजने आणि इतर नोंदी घेऊन जुळे जन्मलेले उत्कृष्ट वजनवाढीचे बोकड निवडून ते विकत घेतले जातात, ते जोपासून परत प्रकल्पातील गावांमध्ये पैदाशीसाठी पाठवले जातात.

Goat Farming
Goat Farming : शास्त्रीय पद्धतीने बोकडाचे खच्चीकरण

आंतरप्रजनन टाळण्यासाठी दर वर्षी गावातील बोकड बदलले जातात. असे शंभरपेक्षा जास्त निवडक उस्मानाबादी बोकड पैदाशीसाठी पाठविण्यात आले आहेत. निवडक ७६ बोकडांचे वीर्य गोठवून आतापर्यंत साठ हजारांच्या आसपास रेतमात्रा कर्नाटक व महाराष्ट्र सरकार, माणदेशी फाउंडेशन व खासगी कृत्रिम रेतन व्यावसायिक व तंत्रज्ञांना पुरवण्यात आले आहेत. ‘नारी’ संस्थेमध्ये प्रशिक्षित ३२ शेळी सख्या माणदेशी फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील एकूण २५० गावांत ‘शेळीपालकाच्या दारात कृत्रिम रेतन’ करून सुधारित बोकडांच्या उत्पादनक्षमतेचा लाभ त्यांना मिळवून देत आहेत.

अखिल भारतीय प्रकल्पातील अडथळे

जातिवंत बोकड निवडून पुरवण्याचा अखिल भारतीय प्रकल्प केरळातील मलबारीपासून उत्तराखंडातील हिमालयन शेळीपर्यंत आणि अंदमानातील शेळीपासून लडाखमधील चांगथांगी शेळीपर्यंत भारतातील १९ शेळ्यांच्या जातींमध्ये कार्यरत आहे. परंतु कृत्रिम रेतन सुविधा फार कमी ठिकाणी पुरवली जाते.

या प्रकल्पाची संकल्पना शास्त्रीयदृष्ट्या अचूक व महत्त्वाची आहे. परंतु तुटपुंजे व अनिश्‍चित अर्थसाह्य, भारंभार माहिती गोळा करणे, त्याच्या शास्त्रीय विश्‍लेषणावर अवास्तव भर, दरवर्षी भरपूर वजन वाढ, दूध वाढ ‘दाखविण्याचा’ दबाव आणि त्यामुळे काही वेळा काही केंद्रांकडून दिली जाणारी चुकीची आकडेवारी, गाव पातळीवर शेळीपालकांच्या संस्थात्मक उभारणीला दिलेले कमी महत्त्व, त्यासाठी न दिले जाणारे अर्थसाह्य, वेगवेगळ्या भागामधील उच्च उत्पादनक्षमतेच्या शेळ्या शोधायला दिले जाणारे अपुरे महत्त्व इत्यादी कारणांमुळे या प्रकल्पांचा आवाका मर्यादित राहिला आहे. त्यामधून अपेक्षित सुधारणा दिसून येत नाही. परंतु प्रकल्पामुळे उस्मानाबादी शेळीची उच्च उत्पादनक्षमता सिद्ध झाली. आकार, वजन, दूध, व्यायल्यानंतर पुन्हा लवकर फळण्याचा गुणधर्म, होणाऱ्या करडांची संख्या, करडांचे वजन या सर्व उत्पादन क्षमतेच्या निकषांमध्ये उस्मानाबादी शेळी श्रेष्ठ आहे.

Goat Farming
Goat Farming : शेळीपालकांसाठी आधुनिकता आणि एकजुटीचा फॉर्म्युला

बोअर जातीचा सर्वत्र प्रसार

फलटण (जि. सातारा) येथील महाराष्ट्र शेळी, मेंढी संशोधन व विकास संस्थेने १९९०च्या दशकात दक्षिण आफ्रिकेतील मटणासाठी जगप्रसिद्ध बोअर जातीच्या शेळ्यांचे भ्रूण ऑस्ट्रेलियन सरकारच्या अर्थसाह्याने भारतात आणले आणि बोअर जातीच्या पहिल्या केंद्रीय कळपाची सुरुवात केली. ‘शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतन यशस्वी होत नाही’ या प्रचलित समजाला फाटा देऊन संस्थेने कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाच्या साह्याने बोअर जातीचा सर्वत्र प्रसार केला. बोअर-संकरित करडांची वजने भराभर वाढतात असे निदर्शनास आले; संकरित करडांचे मटण खाऊन लोक म्हणू लागले, की आता खरी मटणाची रंगत अनुभवायला मिळाली. अनेक तरुणांनी बोअर शेळ्यांचे ठाणबंद पद्धतीचे फार्म चालू केले.

खूप जास्त दराने बोअर शेळ्या आणि बोकडांची विक्री पैदाशीसाठी चालू झाली. परदेशात विकसित झालेल्या शेळीच्या जातीने ग्रामीण महाराष्ट्रात एक अर्थक्रांती घडवून आणली. परंतु दुर्दैवाने त्या क्रांतीचा विश्‍लेषणात्मक अभ्यास झाला नाही. दक्षिण आफ्रिकेतील शेळीपालकांनी बोअर शेळी पद्धतशीररीत्या आनुवंशिकदृष्ट्या सुधारली.

आनुवंशिक सुधारणा (म्हणजेच पाहिजे त्या गुणधर्मांचे जास्त उत्पादकतेचे जनुक) पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होत राहते. म्हणजेच ती कायमची सुधारणा असते. भारतातील स्थानिक व अत्यंत गुणी अशा शेळ्या-मेंढ्यांच्या जातींमध्ये अशी सुधारणा क्वचितच झालेली आहे, तीही फार मोठ्या प्रमाणावर नाही. ही बाब प्रकाशात आणण्यासाठी ‘तर उस्मानाबादी असती बोअरच्या बरोबरीत’ असा एक लेखही मी ‘ॲग्रोवन’मध्ये लिहिला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com