Animal Care
Animal CareAgrowon

Animal Disease : जनावरांतील मूतखडा आजारावरील उपाय

Animal Care : चाऱ्यातील अतिरिक्त अपायकारक द्रव्ये आणि शरीरातील अपायकारक खनिजद्रव्ये संयोगाने एकाच ठिकाणी साचत राहिल्यामुळे मूतखडे तयार होतात. यांच्या आकारामुळे आणि मूत्रसंसंस्थेतील स्थानामुळे अडथळा निर्माण होतो. त्याचा जनावराच्या शरीरावर गंभीर परिणाम होतात. लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना करणे फायदेशीर ठरते.

डॉ. सय्यद मोहम्मद अली, डॉ. एस. एस. पठाण

Urinary Stones in Animals : अनावश्यक घटक तसेच अपायकारक द्रव्ये रक्ताबाहेर काढणे आणि ते मूत्राद्वारे विसर्जित करण्याचे काम मूत्रसंस्था करत असते, परंतु शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये आणि मूत्रसंस्थातील अतिरिक्त ताण पडल्यामुळे मूत्रसंस्थेमध्ये बिघाड झाल्यास मूतखडा होऊन मूत्रविसर्जित करण्यास अडथळा होऊ शकतो.

मूत्रसंस्थेमधील मूत्रपिंड, मूत्रवाहिनी, मूत्राशय, मूत्रनलिकामध्ये चाऱ्यातील अतिरिक्त अपायकारक द्रव्ये आणि शरीरातील अपायकारक खनिजद्रव्ये यांच्या संयोगाने एकाच ठिकाणी साचत राहिल्यामुळे मूतखडे तयार होतात.

यांच्या आकारामुळे आणि मूत्रसंसंस्थेतील स्थानामुळे अडथळा निर्माण होतो. त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. मूतखडा हे कठीण स्फटिक आहे. प्रामुख्याने ॲपटाईट, मॅग्नेशिअम कॅल्शिअम फॉस्फेट, कॅल्शिअम कार्बोनेट, सिलिकेट, कॅल्शिअम ऑक्सालेटचे कठीण स्फटिक असतात.

Animal Care
Animal Protect : जनावरांमधील उष्माघाताकडे लक्ष द्या

मूतखडा होण्याची कारणे

मूतखडा हा प्रमुख्याने वयस्क बोकड, मेंढा, गुरे, रेडा यांच्यामध्ये आढळतो.

नर पशूमध्ये शरीर रचना शास्त्राप्रमाणे मूत्राशयाची नलिका लहान असल्यामुळे मूतखडा झाल्यास लघवी कमी बाहेर पडते. जास्त काळ असल्यास लघवी मूत्राशयाची पिशवीमध्ये जमा होऊन मूत्राशयाची पिशवी फुटू शकते किंवा मूत्र नलिकेला छिद्र पडू शकते.

मूतखडा मानवाप्रमाणे पशूंमध्ये देखील आढळतो. पशूंमध्ये हा आजार प्रामुख्याने खाद्यामध्ये असलेल्या ऑक्झिलेट, इस्ट्रोजन आणि सिलिकामुळे होऊ शकतो.

पिण्याच्या पाण्यात जास्त प्रमाणात असलेले क्षार देखील आजारास कारणीभूत ठरतात.

आजाराची तीव्रता वाढल्यानंतर जनावरे मूत्रविसर्जन योग्य प्रकारे करत नाही. शेवटी शस्त्रक्रियेचा आधार घ्यावा लागतो.

Animal Care
Animal Husbandry : पशुपालन,सेवा क्षेत्रामध्ये डेन्मार्कची आघाडी

लक्षणे

चारा कमी खाणे किंवा न खाणे.

जनावर शांत उभे राहून श्वासोच्छ्वास वाढतो. वेदनेमुळे पोटाकडे पाहून पाय झाडते.

लघवी होत नसल्यामुळे असहाय्य वेदनेमुळे दाताचा करकर असा आवाज करत अस्वस्थ उभे राहते.

लघवी होण्यासाठी वारंवार जोर लावते, मूत्रनलिका चाटते आणि जोरात हंबरते.

पोटाच्या खालच्या भागाला सूज येते. तेथे हात लावल्यास खड्डा पडतो. (शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे).

पोट सुजते किंवा फुगते.

लघवीचा रंग आणि वास बदलतो.

वरील लक्षणे आढळल्यास त्वरित पशुवैद्यकास दाखवून योग्य उपचार पद्धतीचा अवलंब करावा.

घ्यावयाची काळजी

पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वयात नर जनावराचे खच्चीकरण करून घ्यावे.

जास्त तंतुमय पदार्थ असलेला चारा दिल्यास त्याच्या पचन क्रियेस जास्त पाणी लागते. त्यामुळे जनावरांना दररोज मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.

उच्च प्रतीचा चारा द्यावा. धान्याचे प्रमाण कमी ठेवावे.

डॉ. सय्यद मोहम्मद अली, ९५४५०४०१५५ (लेखक पशुशल्यचिकीत्सक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com