Livestock Market : जनवारे बाजारात मंदीचे चित्र कायम

Milk Rate : सातत्याने कमी होत असलेल्या दूध दरामुळे जनावरे बाजारावर मंदीचे संकट घोंघावत आहे.
Livestock Market
Livestock MarketAgrowon

Baramati News : दूध दरवाढीची शक्यता मागील महिन्यात मावळल्यानंतर दुधाच्या दरामध्ये दीड ते दोन रुपयांनी कपात झाली होती. यानंतर आता जनावरे बाजारामध्ये देखील त्याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. सातत्याने कमी होत असलेल्या दूध दरामुळे जनावरे बाजारावर मंदीचे संकट घोंघावत आहे.

बारामती येथील बाजारात गुरुवारी (ता.११) संकरित गाईंच्या किमती तब्बल ३० ते ४० हजारांनी खाली उतरल्या असून जनावरे बाजारात शेतकरी ग्राहकांऐवजी व्यापारीच दिसून येत आहेत. जानेवारी २०२४ मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची दुग्धविकास मंत्र्यांची घोषणा केली होती. त्याचे परिणाम त्यावेळी देखील बारामती येथील जनावरे बाजारावर दिसून आला होता.

Livestock Market
Livestock Farming : जव्हार तालुक्यात पशुधनवाढीला चालना मिळणार

मार्च महिन्यामध्ये दूध दरात दीड ते दोन रुपयांची कपात झाली. दरामध्ये कपात होण्यापूर्वी दुधाला २६ ते २७ रुपये दर मिळत होता. आता हा दर २४ ते २५ रुपयांवर आला आहे. असले तरी गेल्या काही दिवसात पशुधाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

त्यामुळे सहाजिकच दुधाच्या उत्पादन खर्चात देखील वाढ झाली आहे. डिसेंबर (२०२३) महिन्यांपासून जनावरे बाजारामध्ये मंदीचे चित्र उभे राहिले आहे. जस जसा सध्या चारा टंचाईचे संकट अधिकाधिक गडद झाले आहे. त्याचाही परिणाम सध्या जनावरे बाजारात दिसू लागला आहे.

आठ महिन्यांपूर्वी २५ ते ३० लिटर प्रतिदिन दूध उत्पादन क्षमता असणारी एक संकरित गाय सुमारे दीड ते पावणेदोन लाखापर्यंत बाजारामध्ये मिळत होती. आज या गायीची किंमत ९० हजार ते १ लाखापर्यंत आली आहे. उन्हाळ्याची तीव्रता व दूध दराची स्थिती लक्षात घेता पुढील काही दिवसांमध्ये जनावरे बाजारामध्ये संकरित गाईंचे दर आणखी कोसळण्याचा धोका आहे.

Livestock Market
Livestock Market : लाखमोलाचे पशुधन बाजारात

दूध व्यवसायासोबतच दूध उत्पादक शेतकरी उच्च जातकुळीच्या संकरित गाईंची पैदास करत असतो. उच्च जात कुळीच्या संकरित गाईंची पैदास करत असताना संबंधित पशुपालक मोठ्या प्रमाणात खर्च देखील करतो. वासराच्या जन्मापासून ते त्याच्या विक्रीपर्यंत तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुपालक या गाईंची काळजी घेतो. मात्र, दूध दर कोसळल्यामुळे या व्यवसायाला देखील मोठा फटका बसला आहे.

दुधाचे दर वाढले तर गाईंच्या किमतीमध्ये वाढ होईल. अन्यथा या किमती दिवसेंदिवस कमी होत जातील. दूध दर कमी झाला तरी संकरित गाई संभाळण्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्यामध्ये कुठेही मंदी येत नाही. खासगी दूध संस्थांना सक्षम पर्यायी स्पर्धक नसल्याने मनाला वाटेल ते दर दुधाला दिले जातात.
- बाबा भोसले, दूध उत्पादक शेतकरी, तांदूळवाडी (ता.बारामती)
सध्या जनावरे बाजारामध्ये संकरित गाईच्या किमती ३० ते ४० हजारांनी कमी झाल्या आहेत. दूध तर पडल्यामुळे मागील दोन बाजार मंदीचे चित्र आहे. १ लाख ५० हजार रुपयांची ३० ते ३५ लिटर प्रतिदिन दूध उत्पादन क्षमतेची एक गायीची किंमत १ लाख ते १ लाख १० हजारापर्यंत खाली आली आहे. मात्र तरीही ही गाय घेण्यासाठी शेतकरी बाजारात येत नाही. काही वेळा बाजारामध्ये फक्त व्यापाऱ्यांमध्येच खरेदी विक्री होते.
- बादशाह शेख, जनावरे व्यापारी, लासुर्णे (ता. इंदापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com