Animal Care : पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष

Animal Health : पावसाळ्यात बदलत्या हवामानासोबतच ओलसरपणा, चिखल, अस्वच्छता यामुळे रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यविषयक समस्या जास्त प्रमाणात वाढतात. हे लक्षात घेऊन जनावरांच्या व्यवस्थापनात बदल करावेत.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. शिवानी मुरळे, डॉ. विकास कारंडे

Animal Health Care During Monsoon : जनावरांचा गोठा योग्य पद्धतीने बांधलेला असावा. गोठ्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी. गोठ्यातील गटार, गव्हाण व जनावरांना उभे राहण्याच्या जागेवर भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी शक्‍यतो लांबीच्या बाजूने गोठा दक्षिण-उत्तर दिशेस असावा. गोठ्यातील  जमीन भाजलेल्या विटांच्या असाव्यात किंवा सिमेंटच्या असाव्यात जेणेकरून पाण्याचा निचरा होऊन स्वच्छता राहण्यास मदत होईल.

मलमूत्राचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे. मलमूत्र साठून राहिल्यास डास, माश्‍या व गोचीड यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जमिनीस गव्हाणीकडून उतार दिलेला असावा. जनावरांना पुरेशी जागा उपलब्ध असावी. प्रत्येक गाईसाठी किमान ४० चौरस फूट एवढी जागा उपलब्ध असावी. गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा. गोठ्यातील जमिनीवर चुनखडी किंवा मुरमाचा वापर केल्यास ओलसरपणा कमी होतो. गोठ्याच्या आजूबाजूला मोकळी जागा असावी. गोठ्याच्या दोन्ही बाजूंस जागा ठेवून कुंपण करावे. स्वच्छ पाण्याची सोय करावी.

Animal Care
Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

जनावरांचे व्यवस्थापन

कासदाह, जंतांचा प्रादुर्भाव, ओलाव्यामुळे बाह्य परोपजीवी तसेच गोठ्यातील ओलसरपणामुळे खुरांना जखमा होतात. खूर मऊ होणे, जखमांमध्ये अळ्या होतात, गोठ्यात काही वेळा जनावर घसरून पाय मोडतात, सांधा निखळतो. जनावरांना काहीवेळा विविध प्रकारची विषबाधा होते. हगवण, अपचनासारख्या समस्या दिसतात.

पावसाळी वातावरणात संसर्गजन्य आजारांचा (घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकूत) प्रादुर्भाव होतो. हे लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी जनावरांना लसीकरण करावे.

आजारी जनावरावर पशुवैद्यकामार्फत त्वरित उपचार करावेत, म्हणजे इतर जनावरांना तो आजार होणार नाही.

Animal Care
Animal Care : पशुधनांची काळजी घेऊन रोगांचा प्रादुर्भाव टाळा

दुधाळ जनावरांच्या कासेची योग्य काळजी न घेतल्यास कासदाह होतो. हे लक्षात घेता दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी, दूध काढल्यानंतर सडांचे निर्जंतुकीकरण करावे. यामुळे सडाच्या छिद्रातून सूक्ष्मजीव जात नाहीत.

दूध काढणारी व्यक्ती निर्व्यसनी, निरोगी असावी. खराब दूध (गाठी, रक्त,पू) निघाल्यास तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.

शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ नये म्हणून, लसीकरण करण्याच्या एक आठवडा आधी त्यांना हलके काम द्यावे. लस दिल्यानंतर मानेवर गाठ येऊ नये म्हणून, त्या जागेवर हलकेच चोळावे. आलेल्या गाठीला कोमट पाण्याने शेकल्यास गाठ विरून जाते. लसीकरण तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावे.

वासराला पहिले ६ महिने; दर ३० दिवसांनी आणि त्यानंतर प्रत्येक ४ महिन्यांनी जंतनाशक द्यावे. प्रत्येक ऋतूच्या सुरुवातीला एकदा जंतनाशक पाजावे.

गोठ्यामधील भिंतीच्या भेगांमध्ये गोचिडांची अंडी असतात. त्यामुळे ठरावीक कालावधीनंतर फ्लेमगनच्या साह्याने गोचिडांच्या अंड्यांचा नायनाट करावा.

हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण पुष्कळ असते. जनावरे फक्त हिरवा चारा खात असतील तर जनावरांचे पोट बिघडून अपचन, हगवण, बुळकांडी यांसारखे आजार होतात. यामुळे जनावरांना पावसाळ्यात थोडासा सुका चारा देणे गरजेचे आहे. यामुळे पचनसंस्था चांगली काम करते. हिरवा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे रक्तात आम्लता वाढते ,त्यामुळे दुधातील स्निग्धता कमी होते. खाद्य,चारा भिजला असेल तर बुरशींची वाढ होते. असे खाद्य खाल्ल्यामुळे जनावरांना विषबाधा होते. विषबाधा झाली तर पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.

पावसाळ्यात गोठ्याच्या आजूबाजूस गवत, झुडपांची वाढ होते. अशा वेळी साप, विंचू गोठ्याच्या जवळ आढळतात. काही वेळा जनावरांना दंश करतात. हे लक्षात घेऊन गोठ्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.

डॉ. विकास कारंडे, ९०२९८०२३२३

(औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com