Lumpy Skin : खानदेशात ‘लम्पी स्कीन’चा विस्फोट

खानदेशात सर्वच भागांत पशुधनात लम्पी स्कीन आजार आढळला आहे. त्यामुळे तीन हजारांपेक्षा अधिक पशुधन बाधित झाले आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः खानदेशात सर्वच भागांत पशुधनात लम्पी स्कीन आजार (Lumpy Skin Disease) आढळला आहे. त्यामुळे तीन हजारांपेक्षा अधिक पशुधन बाधित झाले आहे. आतापर्यंत २२० पेक्षा अधिक पशुधन मृत्युमुखी (Livestock Died Due To Lumpy Skin) पडले आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी’ लसीकरणासाठी प्रति जनावरामागे २० रुपये आकारणी

लम्पी स्कीन आजारामुळे राज्यात सर्वाधिक मृत्यू जळगाव जिल्ह्यात झाले आहेत. पशुसंवर्धन विभागातर्फे (Department Of Animal Husbandry) आतापर्यंत दोन लाख २५ हजार जनावरांना लसीकरण (Lumpy Skin Vaccination) करण्यात आले आहे. धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे अडीच लाख पशुधनाचे लसीकरण झाले आहे.

पण विलगीकरण छावण्या कुठेही सुरू नाहीत. आजारी पशुधनही गावात, गोठ्यात असते. त्यामुळे इतर पशुधनावरही हा आजार पसरत आहे. पशुसंवर्धन विभागाने मागील वर्षी लसीकरण केले नाही. तसेच जून व जुलैमध्येही यंदा कुठलीही मोहीम हाती घेतली नाही. सपशेल दुर्लक्ष केले. यामुळे खानदेशात त्याचा आता विस्फोट झाला आहे.

Lumpy Skin
Lumpy Vaccination : अकोल्याने ओलांडला दोन लाखांचा लसीकरण टप्पा

आजारी नसलेल्या सर्व पशुधनावर, तसेच गोठ्यात बाह्य कीटकांच्या निर्मूलनासाठी ग्रामपंचायतींतर्फे पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधांची फवारणी करण्याचे आवाहन केले जात आहे. पण अपवाद वगळता या आवाहनास ग्रामपंचायतींनी प्रतिसाद दिलेला नाही.

खानदेशात प्रशासनाने फक्त कागदोपत्री काम केले. त्यात जिल्ह्यातील जनावरांचे सार्वजनिक बाजार बंद केले. इतर राज्यांमधून आंतरराज्य सीमेवरून पशुधनाची होणारी वाहतूक बंद केली. पशुधन एकत्र येतील, असे सार्वजनिक चराई व सार्वजनिक पाणी पिण्याचे सार्वजनिक हौद काही काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश आहेत. पण काही गावांतच या आदेशांचे पालन केले जात आहे.

खासगी पशुवैद्यकांवर कारवाई नाहीच

सर्व खासगी पदविकाधारकांनी ‘लम्पी स्कीन’ची माहिती शासकीय पशुवैद्यकीय संस्थेस देणे बंधनकारक आहे. उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसारच करावेत. खासगी पदविकाधारकांनी लम्पी स्कीन आजारावर परस्पर उपचार करू नयेत,

त्याबाबत पशुसंवर्धन विभागाकडे नोंद करावी, अन्यथा उपचार करताना पशुधनाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यास संबंधित खासगी पशुवैद्यकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पण कुठेही अशी कारवाई खासगी पशुवैद्यकांवर झालेली नाही.

आतापर्यंत जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ने १२२ पेक्षा अधिक पशुधनाचा मृत्यू झाला आहे. २ लाख २५ हजार पशुधनाचे लसीकरण झाले आहे. पशुपालकांनी जनावरांना हा आजार झाल्याचे लक्षात येताच पशुसंवर्धनपण विभागाला कळवून उपचार सुरू करावेत.
डॉ. श्‍यामकांत पाटील, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com