Animal Care : व्याल्यानंतर गाई - म्हशींना कसा आहार द्यावा?

Team Agrowon

व्यायल्यानंतर ३५ ते ४५ दिवसांपर्यंत गायी-म्हशींचे दूध वाढत जाते. या काळात जितके जास्त दूध आपल्याला मिळवता येईल तितके त्या वेतातील एकूण दूध उत्पादन वाढते.

Animal Care | Agrowon

या काळात जनावरांमध्ये ऊर्जेची कमतरता (निगेटिव्ह एनर्जी) दिसून येते. तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोअर) खालावतो. कारण दुधावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून जातात.

Animal Care | Agrowon

या वेळेस गाय उलटण्याचे प्रमाण वाढते, कारण नवीन वासरू जन्माला घालण्यासाठी लागणारी ऊर्जा शरीरात कमी पडते.

Animal Care | Agrowon

शरीरातील चरबी यकृतावर (लिव्हर) जमा होऊन ‘फॅटी लिव्हर’ नावाचा आजार होण्याची शक्यता बळावते.

Animal Care | Agrowon

त्यामुळे यकृत पूर्ण क्षमतेने शरीरासाठी लागणारे ग्लुकोज तयार करू शकत नाही. यामुळे गाय एकूणच तिच्या क्षमतेपेक्षा कमी दूध व फॅट उत्पादन करते.

Animal Care | Agrowon

बहुतांश दूध उत्पादकांकडील गायी म्हशींमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी निदर्शनास येतात. यामुळे जनावरांमधील ऊर्जेची कमतरता बायपास फॅटच्या स्वरूपात भरून काढल्यास पूर्ण क्षमतेने दूध व फॅट उत्पादन घेणे शक्य होऊन जनावर वेळेवर गाभण राहण्यासही मदत होते.

Animal Care | Agrowon
Lemon market | Agrowon