Embryo Transplantation : भ्रूण प्रत्यारोपण तंत्र गोठ्यापर्यंत नेण्यात ‘एनडीडीबी’ला यश

Animal Care : अत्याधुनिक तंत्राच्या आधारे दुधाळ जनावरांची संख्या वाढविण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपणाचे तंत्र थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत नेण्यात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ अर्थात ‘एनडीडीबी’ यश आले आहे.
Animal care
Animal careAgrowon
Published on
Updated on

Pune News : अत्याधुनिक तंत्राच्या आधारे दुधाळ जनावरांची संख्या वाढविण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपणाचे तंत्र थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत नेण्यात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ अर्थात ‘एनडीडीबी’ यश आले आहे. राज्यात आतापर्यंत ५०० जातिवंत भ्रूणपुरवठा करण्यात आला आहे. राहुरीत गोठीत वीर्यमात्रांचे उत्पादन ७५ लाखांपर्यंत नेण्यात शक्य झाले आहे.

‘एनडीडीबी’चे वरिष्ठ सहयोगी डॉ. शिवकुमार पाटील व राहुरी येथील वीर्य केंद्राचे प्रमुख डॉ. सरोज वाहाने यांनी गुरुवारी (ता. ३) पत्रकारांना काही उपक्रमांची माहिती दिली. राहुरीत २४० एकर जागेत वीर्य केंद्र (सीमेन स्टेशन) उभारण्यात आले आहे. तेथे जातिवंत वळूंपासून पहिल्या वर्षी १४ लाख; तर गेल्या वर्षी ७५ लाख गोठित वीर्य मात्रा तयार करण्यात आल्या.

पुढील वर्षी मात्रांचे उत्पादन एक कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. उच्च आनुवंशिक गुणवत्तेच्या जनावरांची वाढ करण्यासाठी देशभर ‘एनडीडीबी’ने विविध उपक्रम सुरू केले आहेत. सांगलीच्या इस्लामपूर भागात या प्रकल्पातून लक्ष्मी नावाच्या कालवडीला जन्मास घातले आहे. ‘लक्ष्मी’ भविष्यात ४० लिटरपर्यंत दूध देण्याची शक्यता असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Animal care
Animal Care : दूध उत्पादन वाढीसाठी जनावरांच्या पोषणावर लक्ष द्या

दुधाळ जनावरांच्या उत्पादनासाठी ‘एनडीडीबी’कडून आधी जातिवंत वळूंपासून वीर्य काढले जाते. त्यापासून भ्रूण तयार केला जातो. कमी दिवसांचा भ्रूण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार थेट गोठ्यात जाऊन गायींमध्ये प्रत्यारोपित केला जातो. केंद्र सरकारच्या मूळ प्रकल्पानुसार येत्या तीन वर्षांत देशभर दोन लाख भ्रूणांचे प्रत्यारोपण होईल. या प्रकल्पात ‘एनडीडीबी’ने आतापर्यंत देशात १५०० भ्रूणांचे प्रत्यारोपण केले आहे. त्यापैकी ५०० भ्रूण महाराष्ट्रात वापरण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी ‘एनडीडीबी’ने ‘कात्रज’, ‘राजारामबापू’ व ‘गोकुळ’सारख्या नामांकित सहकारी दूध संघांसोबत करार केले आहेत.

Animal care
Embryo Transplantation Technology : भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे थारपारकर कालवडीचा जन्म

‘एनडीडीबी’ने यंदा देशभर ३६०० गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या भ्रूणाची किंमत २१ हजार रुपयांपर्यंत आकारली जाते आहे. यात केंद्राकडून पाच हजार रुपये अनुदान मिळते. त्यामुळे भ्रूण प्रत्यारोपणाची सुविधा शेतकऱ्याला केवळ १६ हजार रुपयांत उपलब्ध आहे. दूध संघांनी करार केल्यास हा खर्च १० हजार रुपयांच्या खाली जातो.

‘यशस्वितेचे प्रमाण तीन भ्रूणांमागे एक’

डॉ. पाटील म्हणाले, “जातिवंत दुधाळ जनावरांचे भ्रूण ‘एनडीडीबी’च्या अहमदाबाद, हैदराबाद प्रयोगशाळेत तयार होतात. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सात दिवसांचे भ्रूण विमानाने पुण्यात आणले जातात. विमानतळावरून वाहनाने थेट शेतकऱ्याच्या गोठ्यात भ्रूण नेला जातो. प्रत्यारोपण यशस्वितेचे प्रमाण तीन भ्रूणांमागे एक असे दिसून येते. देशातील दुग्धक्रांतीला चालना देण्यासाठी काही वर्षांपूर्वी डेन्मार्कमधून ८० वळू आणले गेले होते. त्यातील ३२ वळू राहुरी केंद्राला देण्यात आले आहेत.”

दुधाळ जनावरांचा पुरवठा शेतापर्यंत

‘एनडीडीबी’ने आता शेतकऱ्यांना हवी ती जातिवंत म्हैस किंवा गाय थेट दारापर्यंत आणून देण्याची सेवा सुरू केली आहे. मागणी नोंदविल्यानंतर ‘एनडीडीबी’कडे ३० टक्के रक्कम आगाऊ भरावी लागते. त्यानंतर ‘एनडीबीबी’चे तज्ज्ञ कर्मचारी थेट संबंधित राज्यात जातात. तेथे जनावरांच्या सर्व शारीरिक चाचण्या व वंशविषयक माहिती पडताळली जाते. त्यानंतर खरेदी केलेली जनावरे थेट शेतकऱ्याच्या गोठ्यात आणून दिली जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com