Animal Care : दूध उत्पादन वाढीसाठी जनावरांच्या पोषणावर लक्ष द्या

Animal Feed Management : वातावरणातील अनुकूल बदलांमुळे दुधाळ जनावरांच्या प्रजनन क्षमतेमध्ये वाढ झालेली दिसून येते. उष्णतेच्या ताणामुळे गर्भधारणेचे प्रमाण ३० ते ४० टक्के कमी होऊ शकते.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. अनिल पाटील, डॉ.अनुजकुमार कोळी

Milk Production : रेतन केल्यानंतर जनावरांतील माजाची खात्री पुढील २१, ४२, ६३ व्या दिवशी करावी. आर्द्रता वाढू नये म्हणून गोठा हवेशीर असणे गरजेचे आहे, जेणेकरून श्वसनाचे आजार टाळता येतात. गाभण जनावरांना संतुलीत व पौष्टिक आहार द्यावा.स्वतंत्र निगा करावी.

वातावरणातील अनुकूल बदलांमुळे दुधाळ जनावरांच्या प्रजनन क्षमतेमध्ये वाढ झालेली दिसून येते. उष्णतेच्या ताणामुळे गर्भधारणेचे प्रमाण ३० ते ४० टक्के कमी होऊ शकते. गर्भाशयामध्ये गर्भधारणेची वेळ हा गर्भधारणेचा सर्वात संवेदनशील टप्पा असतो. प्रजननानंतरच्या ८ ते १६ दिवसातील तापमान बदल गर्भधारणेवर विपरीत परिणाम करते. उष्णतेच्या महिन्यात दुधाळ जनावरे उष्णतेच्या तणावामध्ये जातात. सरासरी खाद्यापेक्षा कमी खातात, परिणामी वजन कमी होते आणि गर्भधारणेच्या कार्यक्षमतेत घट दिसून येते. उष्ण तापमानामुळे दुधाळ जनावरांवर ताण येतो, त्यामुळे पशुखाद्याचे सेवन कमी होते ज्यामुळे दुधाचे उत्पादन, शरीराचे वजन आणि पुनरुत्पादन कार्यक्षमता कमी होते.

पावसाळा आणि हिवाळा प्रजनन क्षमता वाढीसाठी उपयुक्त ठरतो. या कालावधीमध्ये जनावरांना मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध होतो. या कालावधीत माजावर आलेल्या जनावरांमध्ये कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतन केल्यास त्यांचे गाभण राहण्याचे प्रमाण हे अधिक दिसून येते. पावसाळा ऋतूमध्ये दुधाळ जनावरे माज दाखवतात.

जनावरांचे व्यवस्थापन

सकाळ, सायंकाळ माजाकरीता निरीक्षण करावे.

जनावरांतील रेतन माजाच्या तिसऱ्या टप्प्यात करावे. रेतन केल्यानंतर जनावरांतील माजाची खात्री पुढील २१, ४२, ६३ व्या दिवशी करावी.

गर्भधारणेची खात्री तज्ञ पशुवैद्यकाकडून ३ महिन्याने करून घ्यावी.

गाभण जनावरांना संतुलीत व पौष्टिक आहार द्यावा.स्वतंत्र निगा करावी.

Animal Care
Milch Animal Diet : दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ जनावरांना द्या योग्य आहार

आजारांपासून नियंत्रण

वातावरणातील अचानक होणाऱ्या बदलामुळे दुधाळ जनावरांना अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. वेळीच योग्य उपाययोजना केल्यास आजार टाळता येतात. याकरिता विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

जनावरांना पाऊस, वारा आणि जास्त ओलावा यांपासून संरक्षण करण्यासाठी पुरेसा निवारा असणे आवश्यक आहे.

आर्द्रता वाढू नये म्हणून गोठा हवेशीर असणे गरजेचे आहे, जेणेकरून श्वसनाचे आजार टाळता येतात. जर जनावरांना बांधण्याची जागा ओली असेल तर तिची वेळीच दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

अपघात आणि दुखापती टाळण्यासाठी गोठ्यातील फरशी निसरडी नसल्याची खात्री करावी.

Animal Care
Milch Animal Diet : दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ जनावरांना द्या योग्य आहार

गोठ्यातील पाण्याचा निचरा नाही झाला तर जनावरांच्या आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. जसे की, गर्भाशय, खुरांचे आजार होतात.

जनावरांच्या गरजेनुसार त्यांचा आहार ठरवावा. दुधाळ जनावरांना संतुलित आहार देणे गरजेचे असते.

आहारात उच्च गुणवत्तेचा चारा आणि खनिज पूरक मिश्रणांचा समावेश करावा.

चाऱ्याच्या गुणवत्तेचे नियमित परिक्षण करावे. ओलाव्यामुळे खराब झालेला चारा जनावरांना देऊ नये.

काहीवेळा गवत किंवा हवामानामुळे बुरशी लागलेले खाद्य खाऊ घातल्याने जनावरांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

दुधाळ जनावरांना नेहमी स्वच्छ आणि ताजे पाणी द्यावे.

पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार योग्य लसीकरण आणि जंतनाशक द्यावे.

- डॉ. अनिल पाटील, ७५८८०६२५५६

(पशुप्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com