Kathani Cow : कठानी गोवंशाची राष्ट्रीय पातळीवर नोंद

चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील कठानी गोवंशाला नुकतीच राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. देशातील ५१ वी गोवंश प्रजाती म्हणून कर्नाल (हरियाना) येथील राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संशोधन ब्युरोकडे याची नोंदणी झाली आहे.
Kathani Cow
Kathani CowAgrowon

पुणे ः चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील कठानी गोवंशाला (Kathani Cow Breed) नुकतीच राष्ट्रीय पातळीवर मान्यता (Nation Rating For Kathani Cow) मिळाली आहे. देशातील ५१ वी गोवंश प्रजाती म्हणून कर्नाल (हरियाना) येथील राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संशोधन ब्युरोकडे (National Bureau of Animal Genetics Research) याची नोंदणी झाली आहे.

बाएफ संस्थेतील पशूतज्ज्ञ आणि कठानी गोवंशाचे अभ्यासक डॉ. आर. एल. भगत म्हणाले, ‘‘नोव्हेंबर २०१७ ते मार्च २०२० या कालावधीत चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत कठानी गोवंश पैदास क्षेत्रामधील सद्यःस्थितीचा अभ्यास करून या जातीच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी सुरवात झाली.

Kathani Cow
दुग्धोत्पादनासाठी देशी गोवंश संशोधनावर भर द्या

यासाठी ‘बाएफ’ संस्थेला कठानी गोवंशाचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संशोधन ब्युरोतर्फे प्रकल्प मिळाला. यानुसार आम्ही कठानी गोपालकांची सामाजिक व आर्थिक स्थिती, या भागात जनावरांसाठी उपलब्ध चारा, पशुपालकांची व्यवस्थापन पद्धती तसेच जनावरांच्या वयोमानाप्रमाणे शारीरिक मोजमाप, गुणात्मक माहिती संकलित केली.’’

Kathani Cow
Purnathadi Buffalo : अखेर पूर्णाथडी म्हशीला मिळाले राष्ट्रीय मानांकन

‘‘तीन जिल्ह्यांतील १३ तालुक्यांतील ९,७५० शेतकऱ्यांकडील ९,४७४ कठानी गोवंशांचा अभ्यास करण्यात आला. या गोवंशाची स्वतंत्र वैशिष्टे लक्षात घेऊन राष्ट्रीय पातळीवर नोंद होण्यासाठी पशू संवर्धन आयुक्तांमार्फत प्रयत्न करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर नोंद झाल्याने विदर्भातील आदिवासी पशुपालकांना फायदा होईल,’’ असेही डॉ. भगत म्हणाले.

कठानी गोवंशाला राष्ट्रीय मानांकन प्राप्त होण्यासाठी राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संशोधन ब्युरोमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. तांतिया, डॉ. रेखा शर्मा, ‘बाएफ’ संस्थेचे अध्यक्ष भरत काकडे, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. ए. बी. पांडे, संशोधन संचालक डॉ. जे. आर. खडसे यांचे मार्गदर्शन मिळाले.

कठानी गोवंशाची वैशिष्टे ः

- पांढरा, तांबूस, काळसर रंग. मध्यम आकाराचे शरीर, उत्तम प्रजनन क्षमता.

- विदर्भातील उष्ण हवामानात तग धरुन राहण्याची विशेष क्षमता.

- डोळे, बुबूळ, नाकपुडी, खूर, शिंगे आणि शेपटीचा गोंडा पूर्णपणे काळा.

- शिंगे मध्यम आकाराची, डोक्याच्या बाजूला आणि काही जनावरांमध्ये वरच्या बाजूला वळलेली.

- दिवसाला साधारण अर्धा ते एक लिटर आणि एका वेतात १९० ते १९५ लिटर दूध देण्याची क्षमता.

- दूध देण्याचा कालावधी साडेसात ते आठ महिने

- दुधातील फॅटचे प्रमाण ४.४ टक्के.

- पहिल्या वेताचे वय ५१ ते ५८ महिने. दोन वेतातील अंतर ३८७ ते ५२२ दिवस.

- बैल वजनाने हलके, खूर काळे असल्यामुळे भात शेतीसाठी उपयुक्त.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com