Indigenous Buffalo Breed : राज्याला मेळघाट, गौळाऊ म्हैस मिळणार

Desi Buffalo : महाराष्ट्रात या मोहिमेवर ‘माफसू’कडून काम होत असून त्यानुसार मेळघाट तसेच गौळाऊ म्हशीच्या संबंधित माहितीचे संकलन करण्यावर भर देण्यात आला आहे.
Desi Buffalo
Desi BuffaloAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : देशात अवर्णित जनावरांची संख्या शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट कर्नाल (हरियानी) येथील राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरोद्वारा निश्‍चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात या मोहिमेवर ‘माफसू’कडून काम होत असून त्यानुसार मेळघाट तसेच गौळाऊ म्हशीच्या संबंधित माहितीचे संकलन करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानंतर या जातीच्या जनावरांची नोंद कर्नाल येथील संस्थेकडून घेतली जाणार आहे.

देशातील अवर्णीत जनावरांना ओळख मिळवून देण्याच्या महाराष्ट्रातील प्रकल्पावर महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्यासह विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने यांच्या मार्गदर्शनात काम होत आहे. त्यानुसार पदव्युत्तर पशुवैद्यक महाविद्यालयाचे प्रा. शैलेंद्र कुरळकर यांनी फॅटचे प्रमाण सर्वाधीक असलेल्या मेळघाट म्हशीच्या संबंधित माहितीचे संकलन करून त्याआधारे नोंदणीचा प्रस्ताव दिला आहे.

Desi Buffalo
Indigenous Buffalo: भारतीय म्हशींची वैशिष्ट्यपूर्ण विविधता: स्थानिक जातींचे महत्त्व आणि संवर्धन

मेळघाट म्हशीबाबत सांगताना ते म्हणाले, की मेळघाट म्हैस ही अमरावती जिल्ह्याच्या आदिवासीबहूल मेळघाट परिसरात आढळते. या म्हशीच्या दुधापासून मेळघाटी खोवा तयार होतो. डोंगराळ भागातील असल्याने या म्हशीच्या अंगावर केस जास्त राहतात. या म्हशीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुधाचा फॅट सात टक्‍के, तर एसएनएफ ९ टक्क्यांपर्यंत आहे. सात ते आठ तास ती चराई करते.

Desi Buffalo
Buffalo Farming: म्हैसपालनातून समृद्धीचा मार्ग: रोजगाराची नवी दिशा!

या म्हशीचा बांधा व वजनदेखील कमी राहते, असे निरीक्षण आहे. मेळघाट म्हशीची दूध उत्पादकता सरासरी चार लिटर इतकी आहे. चिखलदरा परिसरात याचे संगोपन होते. त्यासोबतच गौळाऊ म्हशीचा देखील प्रस्ताव ‘माफसू’ने दिला आहे.

या म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण आठ टक्‍के आहे. त्याच आधारावर गौळाऊ पशुपालकांनी पेढा व इतर दुग्धजन्य पदार्थाचे व्यवसाय उभारले आहेत. गवळी समाजातील पशुपालकांद्वारे याचे पालन होते. यवतमाळ व याच जिल्ह्यातील कळंबसह काही भागात या जातीच्या म्हशीचे संगोपन होते. मोठा बांधा राहतो. दूध पावणेपाच लिटर इतके मिळते. ३० ते ३५ हजारांवर हे पशुधन सध्या शिल्लक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com