Lumpy Skin : जनावरे ‘लम्पी स्कीन’मुक्तचे प्रमाण कोल्हापुरात ३२ टक्के

जनावरांचा मृत्युदर ४.६३ टक्के आहे. तर जनावरांचा रोगमुक्त होण्याचा दर ३२.३ टक्के आहे. कमी प्रमाण असलेल्या तालुक्यात आणखी प्रादुर्भाव होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असल्याचेही डॉ. पठाण यांनी सांगितले.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात लसीकरणाबरोबरच (Lumpy Skin Vaccination) लम्पी स्कीनग्रस्त जनावरांना (Lumpy Infected Animal) योग्य उपचार देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी दिली. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभागाचे (Animal Husbandry Department) पूर्ण पथक आदींसह अन्य घटकांच्या सहकार्याने व सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने आजारावर नियंत्रणासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin : लाख मोलाच्या खिलारवर ‘२४ तास’ लक्ष

जिल्ह्यात प्रादुर्भावाचा दर ०.२५ टक्के आहे. जनावरांचा मृत्युदर ४.६३ टक्के आहे. तर जनावरांचा रोगमुक्त होण्याचा दर ३२.३ टक्के आहे. कमी प्रमाण असलेल्या तालुक्यात आणखी प्रादुर्भाव होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असल्याचेही डॉ. पठाण यांनी सांगितले.

Lumpy Skin
Lumpy Skin : बैलपोळ्यावर ‘लम्पी स्कीन’चे सावट

आमच्या कर्मचाऱ्यांबरोबरच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, काही महाविद्यालयीन युवकांची मदत घेऊन जनावरांना लसीकरण व अन्य सुविधा दिल्या जात आहेत. जिल्ह्यात २ लाख २१ हजार जनावरांना लम्पी स्कीन प्रतिबंधक लसी देण्यात आल्या आहेत.

गुरुवारअखेर (ता. २२) ३३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २१ गाई व १२ बैलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील तीन तालुके वगळता अन्यत्र लम्पी स्कीनचा प्रभाव कमी आहे. यामुळे ज्या गावांत प्रादुर्भावग्रस्त जनावरे आहेत त्या गावात आम्ही जास्तीत जास्त मनुष्यबळ पुरवून जनावरांना आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

याचबरोबर दगावलेल्या जनावरांची माहिती घेऊन त्यांना शासकीय धोरणाप्रमाणे आर्थिक मदत देण्यासाठी ही प्रयत्न सुरू केले आहेत, असे त्यांनी सांगितले. ज्या गावात तातडीची गरज आहे, त्या गावांना आम्ही रोज भेटी देत असून वेगात काम सुरू केले आहे. अतिरिक्त लसी असल्याने कोणतेही जनावर लसीशिवाय राहू नये यासाठी आम्ही गावोगावी प्रयत्न करत आहोत. बाहेरच्या जिल्ह्यातून प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लवकरच काही नियमावली तयार करत असल्याचे डॉ. पठाण यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com