Lumpy Skin : जनावरांचा बाजार एक महिन्यासाठी राहणार बंद

जिल्ह्यात, राज्यात तसेच परराज्यांत गाय व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील मिरज, कवठेमहांकाळ, जत या तिन्ही तालुक्यांत जनावरांचे बाजार भरविण्यास मनाई केली असल्याचे कळविले आहे.
Livestock Market
Livestock MarketAgrowon

सांगली ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease Outbreak) होत असल्याचे आढळून आले आहे. तो रोखण्यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरज, सांगली, कवठेमहांकाळ, ढालगाव, जत व माडग्याळ येथील जनावरांचे बाजार (Livestock Market) १२ सप्टेंबरपासून १९ ऑक्टोबरपर्यंत एक महिन्याकरिता बंद ठेवण्यात आले आहेत. सांगली, तसेच परजिल्ह्यांतील जनावरांची वाहतूक व विक्री करू नये, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक मंगेश सुरवसे व सचिव महेश चव्हाण यांनी केले.

Livestock Market
Lumpy Skin : सरपंचाचे स्वखर्चातून ५०० जनावरांना लसीकरण

जिल्ह्यात, राज्यात तसेच परराज्यांत गाय व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील मिरज, कवठेमहांकाळ, जत या तिन्ही तालुक्यांत जनावरांचे बाजार भरविण्यास मनाई केली असल्याचे कळविले आहे. त्यानुसार शेतकरी, गोपालक यांनी बाहेरच्या जिल्ह्यांतून पशुधन खरेदी करणे व पशुधनाच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. सांगलीबरोबरच लगतच्या जिल्ह्यामध्येही ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव झालेला असल्याने जिल्ह्यातील जनावरांचे सर्व आठवडे बाजार भरविण्यास मनाई केलेली आहे.

या पार्श्‍वभूमीवर सांगली बाजार समिती कार्यक्षेत्रातील मिरज, सांगली, कवठेमहांकाळ, ढालगाव, जत व माडग्याळ येथे भरणारे जनावरांचे बाजार १२ सप्टेंबरपासून १९ ऑक्टोबरपर्यंत एक महिन्याकरिता बंद ठेवण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील, तसेच परजिल्ह्यांतील व परराज्यांतील तमाम शेतकरी, जनावरांचे व्यापारी व संबंधित अन्य घटकांनी जनावरांची वाहतूक व विक्री करू नये व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीस सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com