मका लागवड कशी करावी?

मक्याचा वापर अन्नधान्याबरोबरच, चारा म्हणून तसेच काही ठिकाणी मक्यावर आधरित प्रक्रिया उद्योगामध्ये प्रामुख्याने केला जातो. अनुवंशिकदृष्ट्या आपल्याकडील दुधाळ जनावरे कितीही उत्तम वंशावळीतली असली, तरीही त्यांच्याकडून जास्त दुधाचे उत्पादन घेण्याकरिता त्यांना सकस चारा पुरविणे गरजचं आहे
Fodder Maize Cultivation Practises
Fodder Maize Cultivation PractisesAgrowon

पशुपालन व्यवसायामध्ये जास्तीत जास्त खर्च हा जनावरांच्या आहार व्यवस्थापनावर होत असतो. आपल्याकडे जनावरांना मक्याचा चारा प्रामुख्याने दिला जातो. मका (Maize) पिकाची वाढ पटकन होऊन, तो खाण्यास रुचकर असतो. हिरव्या वैरणीकरता (green fodder) मक्याचे पिक वर्षभर घेतले जाते. परंतु मका पिकाची वाढ उष्ण व कोरड्या हवामानात चांगल्या प्रकारे होत असते. खरीप हंगामात (kharif season)मक्याची पेरणी करताना, १५ जून ते १५ जुलै दरम्यान करावी.

मक्याकरता पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. हलक्या जमिनीत मक्याची वाढ चांगली होत नाही. पेरणी करण्यापूर्वी जमिनीची एक खोल नांगरणी करून घ्यावी. २ ते ३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या वखरणीच्या वेळेस शेतामध्ये ५ टन शेणखत मिसळावे. शेणखताबरोबर (farm yard manure) हिरवळीच्या खताचा (green manure) वापर केल्यास चांगला फायदा दिसून येतो.

Fodder Maize Cultivation Practises
चवळीप्रमाणे दिसतो राईसबिन चारा

मक्याची पेरणी करताना टोकण पद्धतीने करावी. टपोरी बियाणे असलेल्या पिकांची पेरणी टोकण पद्धतीने केली जाते. टोकण पद्धतींमध्ये दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार योग्य खोलीवर दिली जाते. ही खते बियाण्यांच्या लगेचच संपर्कात येत नाही, मात्र खत उपलब्ध होते. बियाण्यांची पेरणी ३ ते ४ सेमी खोलीवर करावी.

Fodder Maize Cultivation Practises
कसा पुरवाल १० जनावरांना वर्षभर चारा ?

मक्याची चारा म्हणून लागवड करताना हेक्टरी ७५ किलो बियाण्यांची गरज पडते. बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी त्यावर अॅझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. २५० ग्रॅम जीवाणू संवर्धक १० किलो बियाण्यासाठी वापरावे.

चाऱ्यासाठी मक्याचा वापर करताना, चाऱ्यासाठी विकसित केलेल्या जातींचाच वापर करावा. यात अॅफ्रिकन टॉल, मांजरी संमिश्र, गंगा-२, गंगा-५ या वाणांचा वापर करावा.

पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी पिक ५० टक्के फुलोऱ्यात असताना चाऱ्यासाठी कापणी करावी. एका हेक्टर क्षेत्रामधून साधारणपणे ५०० ते ६०० क्विंटल चाऱ्याचे उत्पादन मिळते. आपल्याकडील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र आणि जनावरांची एकूण संख्या लक्षात घेऊन त्यानुसार चारा लागवड करावी. अतिरिक्त चाऱ्याचा मुरघास बनवून ठेवावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com