चवळीप्रमाणे दिसतो राईसबिन चारा

राईसबिन हे चवळीप्रमाणे द्विदल वर्गातील पिक आहे.
Information about ricebean fodder crops
Information about ricebean fodder cropsAgrowon
Published on
Updated on

जनावरांचे चारा व्यवस्थापन करीत असताना हंगामानुसार पिक पद्धतीत बदल केला पाहिजे. आपल्याकडे चाऱ्याच्या अनेक विविध जाती आहेत. या जातींचा वापर त्यांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन केल्यास, चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.

राईसबिन हे चवळीप्रमाणे द्विदल वर्गातील पिक आहे. मेघालय, ओरिसा, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये हे पिक कडधान्य आणि चाऱ्यासाठी घेतले जाते. भातपिकानंतर हे पिक कडधान्य म्हणून घेतले जाते. म्हणून त्यास राईसबिन म्हटले जाते. कोकण राईसबिन-१ ही हिरव्या चाऱ्यासाठी खरीप हंगामासाठी विकसित केलेली जात आहे. ज्या भागातील वातावरण उष्ण व दमट आहे, अशा भागात आपण या चाऱ्याची लागवड करू शकतो.

Information about ricebean fodder crops
कसा पुरवाल १० जनावरांना वर्षभर चारा ?

कोकण राईसबिन-१ ही जात चवळी प्रमाणेच पौष्टिक असल्याचे दिसून आले आहे. या जातीमध्ये १८.३७ टक्के प्रथिने, १.४५ टक्के स्निग्ध पदार्थ, ४२.८६ टक्के पिष्टमय पदार्थ आढळून येतात. या जातीचा चारा गुरे आवडीने खातात.

साधारणपणे खरीप हंगामात ७५ ते ८० दिवसांमध्ये हेक्टरी २० ते २२ टन चाऱ्याचे उत्पादन मिळते. रब्बी हंगामामध्ये जास्त वाढ होत नाही. ही जात कडधान्य म्हणून रब्बी हंगामात घेतल्यास हेक्टरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com