कसा पुरवाल १० जनावरांना वर्षभर चारा ?

उन्हाळ्यात जनावरांचे दूध उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी चारा पिकांचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे.
Fodder Requirement Of Animals
Fodder Requirement Of Animals Agrowon
Published on
Updated on

उन्हाळ्यात जनावरांचे दूध उत्पादन (milk production) टिकवून ठेवण्यासाठी चारा पिकांचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याकडे तीन ऋतूंपैकी दोन ऋतुत हिरवा चारा (green fodder) मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. उन्हाळ्यात मात्र हिरव्या चाऱ्याची टंचाई (fodder scarcity) निर्माण होते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हिरव्या चाऱ्याचे योग्य नियोजन केल्यास उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटू शकतो. यामुळे दूध उत्पादनातील सातत्य टिकवून ठेवता येईल.

आपल्याकडील जनावरांची एकूण संख्या, वय आणि शारीरिक अवस्थेनुसार त्यांची चाऱ्याची गरज बदलत असते. पशुपालकांकडे १० जनावरे असल्यास त्यांची वर्षभर हिरव्या चाऱ्याची गरज भरून काढण्यासाठी चाऱ्याचे नियोजन कसे करायचे ? ते आज आपण पाहूयात.

पशुपालकांकडे तीन एकर जमीन असल्यास, खरीप हंगामात म्हणजे जुलै ते ऑक्टोबरमध्ये पेरणी करताना, एक एकरात हायब्रीड नेपियरची लागवड करावी. दुसऱ्या एक एकरात मका लावावा. अर्ध्या एकरात ज्वारी आणि उरलेल्या अर्ध्या एकरात चवळी लावावी.

Fodder Requirement Of Animals
कोंबड्यांना खाद्यात द्या औषधी वनस्पती

रब्बी हंगामात लागवड करताना एक एकरावर हायब्रीड नेपियर आणि ल्युसर्न गवत लावावे. अजून एक एकरावर बरसीम आणि उरलेल्या एका एकरासाठी प्रत्येकी अर्ध्या एकरावर ल्युसर्न आणि ओट किंवा मका पेरावा.

उन्हाळी हंगामात, मे ते जूनमध्ये पेरणी करण्यासाठी एक एकरावर हायब्रीड नेपियर, दुसऱ्या एक एकरावर ज्वारी. उरलेल्या एक एकरावर प्रत्येकी अर्धा एकरावर मका आणि मूग, उडीद, चवळी किंवा भुईमुग यापैकी एका पिकाची पेरणी करावी.

Fodder Requirement Of Animals
जनावरांना मक्याचा चारा कशासाठी ?

अशा प्रकारे चारा पिकांची पेरणी केल्यास तीन एकर जमिनीतून ६ ते ७ क़्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन दिवसाला मिळेल. म्हणजे वर्षाला साधारणपणे २१९० ते २५५५ क्विंटल हिरवा चारा मिळेल. एक क्विंटल म्हणजे १०० किलो. १० जनावरांसाठी २० किलो चारा विचारात घेतल्यास, दिवसाला २०० किलो चाऱ्याची आवश्यकता पडेल. एका जनावरांचे वजन सर्वसाधारणपणे ४०० किलोच्या आसपास धरल्यास, अशा जनावराला १० ते १५ किलो हिरवा चारा, ४ ते ५ किलो कोरडा चारा देण्याची गरज असते. यासोबतच त्यांच्या शारीरिक अवस्थेनुसार १ ते २ किलोपर्यंत खुराक, ३० ते ५० ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे लागते. सोबतच ३० ग्रॅम मीठही द्यावे. जास्त दुधाचे उत्पादन असणाऱ्या जनावरांना प्रति एक लिटर दुधासाठी ४०० ग्रॅम खुराक वाढवून द्यावा.

उन्हाळ्यात शेतीत पाण्याची सोय नसल्यास हिवाळ्यात हिरव्या चाऱ्याचे अतिरिक्त उत्पादन घेऊ शकतात. या अतिरिक्त हिरव्या चाऱ्याचा मुरघास बनवून, तो जनावरांना हिरवा चारा म्हणून देऊ शकतो. मुरघास म्हणजे एक प्रकारचे हिरव्या चाऱ्याचे लोणचं होय. मुरघासमध्ये हिरव्या चाऱ्यातील पोषकघटक तसेच जतन करून ठेवले जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com