Lumpy Disease : खरंच लम्पीचा नवीन व्हेरियंट आलाय का?

Lumpy Skin Disease : राज्यात लम्पी स्कीनचा फैलाव वेगाने वाढतोय. पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या माहितीनुसार मागच्या पंधरा दिवसात ४२ हजार ७८४ जनावरांना लम्पीची लागण झालीय. तर यंदाच्या एप्रिल ते सप्टेबरच्या काळात एकूण ४ हजार ६३० जनावर दगावलीत त्यामुळे पशुपालकांच मोठ नुकसान होतय.
Lumpy skin disease
Lumpy skin diseaseAgrowon

Lumpy Infection : राज्यात लम्पी स्कीनचा फैलाव वेगाने वाढतोय. पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या माहितीनुसार मागच्या पंधरा दिवसात ४२ हजार ७८४ जनावरांना लम्पीची लागण झालीय. तर यंदाच्या एप्रिल ते सप्टेबरच्या काळात एकूण ४ हजार ६३० जनावर दगावलीत त्यामुळे पशुपालकांच मोठ नुकसान होतय. लम्पीचा फैलाव इतक्या झपाट्याने का वाढतोय?, लम्पीचा नविन व्हेरियंट आलाय का? किंवा जी लस दिली जातेय तीचा काही परिणाम होत नाहीए? लम्पीविषयी असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पण या लम्पी आजाराविषयी विविध क्षेत्रातील पशू तज्ज्ञांच मत जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

केंद्र सरकार तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) येथील तज्ज्ञांच्या सूचनेनुसार ‘लम्पी स्कीन’वरील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात गाभण जनावरे आणि छोटी वासरे यांना वगळण्यात आले होते. त्यामुळेही यंदा याच वयोगटातील जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढलाय. हेही एक महत्वाच कारण आहे.

पण गाभण जनावराला किंवा लहान वासरांना लसीकरण केले तरी कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे यंदा या वयोगटातील जनावरांना लसीकरण केलं जात आहे. अशी माहिती माफसू चे संचालक विस्तार शिक्षण डॉ. अनिल भिकाने यांनी दिली.

Lumpy skin disease
Lumpy: लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी ठाम निर्णय घ्या

गेल्या वर्षी लम्पी आजारान राज्यात थैमान घातल होतं. यंदाही लम्पी स्कीन आजाराचा फैलाव वाढतोय. फैलाव  रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरण मोहीम हाती घेतली. मात्र तरिही लम्पी काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे लम्पीचा नवीन व्हेरियंट तयार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर संशोधन देखील सुरू झाले आहे. अशी माहिती  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी  येथील तज्ज्ञांनी दिली.

कोव्हीड विषाणू जसा स्वत:ला बदलत जास्त घातक बनला तसा हा लम्पी तर बनला नाही ना? अशी शंका पशुपालकांना येतेय. त्यामुळे सध्या  खास लम्पी आजारावरची लस लवकरात लवकर उपलब्ध होण गरजेच आहे. लम्पी चा नविन व्हेरियंन्ट आलाय किंवा नाही हे तपासण्यासाठी लम्पीग्रस्त जनावरांचे जास्तीत जास्त नमुने तपासण्याची गरज आहे. त्यामुळे लक्षणांवरून विषाणूतील बदल लक्षात येतील. असे मत  पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणीचे निवृत्त सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय यांनी व्यक्त केले.

Lumpy skin disease
Lumpy Skin Disease : पुन्हा एकदा 'लम्पी स्किन'चे थैमान

केंद्र सरकार तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजेच एनआयव्ही येथील तज्ज्ञांच्या सूचनेनुसार ‘लम्पी स्कीन’वरील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात गाभण जनावरे आणि छोटी वासरे यांना वगळण्यात आले होते. त्यामुळेही यंदा याच वयोगटातील जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढलाय. हेही एक महत्वाच कारण आहे.

पण गाभण जनावराला किंवा लहान वासरांना लसीकरण केले तरी कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे यंदा या वयोगटातील जनावरांना लसीकरण केलं जात आहे. अशी माहिती माफसू चे संचालक विस्तार शिक्षण डॉ. अनिल भिकाने यांनी दिली.

उपचाराकडे आणि प्राथमीक  शुश्रुषा याकडे दुर्लक्ष झालेली जनावरे या रोगामुळे जास्त दगावु शकतात. साधारण १० टक्केच जनावरांनाच गंभीर स्वरुपाचा लम्पी आजार होतो. या रोगामुळे जनावरे दगावण्याच प्रमाण फक्त २ ते ३ टक्के आहे. त्यामुळे लम्पीग्रस्त जनावर तात्काळ वेगळी करण आणि  रोगावर वेळेवर उपचार आणि शुश्रुषा म्हणजेच नर्सींग होण अत्यंत गरजेच आहे हे लक्षात घेतल पाहीजे. असे मत क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रशांत म्हसे यांनी व्यक्त केले.

याशिवाय देशी गोवंश वर्गातील जनावरांची कातडी पातळ असल्यामुळे या जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव जास्त आहे. काही पशुपालक लम्पी झालेल्या जनावराला लगेच वेगळ करत नाहीत त्यामुळेही हा रोग झपाट्याने वाढतोय. आपल्याकडे जनावरांला पुरवला जाणार आहार तितका चांगल्या दर्जाचा नसतो. चाऱ्याची कमतरता आणि पशुखाद्याचा आभाव या कारणामुळे ही जनावरांची प्रतिकारशक्ती आजाराचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम राहत नाही. तसच एकदा लसीकरण केलं की झालं अस काही पशुपालकांना वाटत.

पण तस नसून जनावरांला एकदा लस दिली की त्याचा प्रभाव ९ ते १२ महिन्यापर्यंत राहतो. त्यामुळे वर्षाला लसीकरण करण अत्यंत आवश्यक आहे.  असं मत पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी व्यक्त केले. एकूणच लसीकरण, वेळेवर उपचार आणि जनावरांची योग्य काळजी घेतली तर लम्पी बरा होतो. त्यामुळे सध्या तरी लम्पीचा नविन व्हेरीयंट आलाय असं म्हणन घाईच ठरेल.

तर शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रशांत म्हसे म्हणतात लम्पी हा आजार देवी वर्गातील विष्णु मुळे होतो. त्यामुळे या रोगासाठी शेळ्यांतील देवी रोगावरची लस दिली जाते.  गेल्या वर्षी राजस्थानात लम्पी रोगाला सुरुवात झाली. त्याठिकाणच्या जनावरांमध्ये दिसणारी लक्षणे ही महाराष्ट्रातील जनावरांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांसारखीच आहेत.

लम्पी विषाणूमध्ये सहसा जनुकीय बदल होताना आढळत नाहीत. रोगाच्या तीव्रतेनूसार आणि जनावराच्या आरोग्याच्या परिस्थितीनुसार थोड्याफार प्रमाणात लक्षणात बदल दिसून येऊ शकतो. त्यामुळे लम्पीचा नविन व्हॅरिएंट आला आहे असं लगेच म्हणता येणार नाही. जसे आरएनए प्रकारातल्या विषाणूमध्ये जनुकीय बदल लवकर लवकर होतात तसे डीएनए प्रकारातल्या विषाणूमध्ये होत नाहीत आणि लम्पी चा विषाणू हा  डीएनए प्रकारातल्या विषाणू मध्ये मोडतो.

त्यामुळे लम्पीचा नविन व्हॅरिएन्ट आलाय असं लगेच म्हणता येणार नाही.  त्यावरील अभ्यास राष्ट्रीय प्रयोगशाळेत चालू आहे. गेल्यावर्षी खिल्लार जातीच्या जनावरांमध्ये लम्पीची तीव्रता जास्त होती. याच नेमक कारण काय हे कळू शकलेलं नाही. तसेच ज्या जनावरांवर जास्त ताण असतो, म्हणजे जास्त कामाचा ताण, दुध उत्पादनाचा ताण याशिवाय गाभण काळ अशी जनावरे या रोगाला बळी पडताना दिसतात. तसेच लहान वासरांची स्वतची प्रतिकारशक्ती तयार झालेली नसते त्यामुळे लहान वासरे या रोगाला जास्त बळी पडताना दिसत आहेत.

लम्पी आजारावर जर लागण झाल्या झाल्या पहिल्याच आठवड्यात उपचार केले तर हा आजार बहुतेक वेळी बरा होऊ शकतो मात्र जर उपचारा कडे दुर्लक्ष झाले तर काही जनावरांमध्ये आजार गंभीर स्वरुप धारण करतो. जनावरांना जर गोचीड ताप आणि इतर समस्या असतील तर आजार गंभीर होतो. तसेच जीवाणूची बाधा झाल्यास किंवा जीवाणू प्रतिजैविकांना प्रतिकारक असल्यास गंभीर फुफ्फुसाचा दाह  आणि सेप्टिसेमीया होतो. उपचाराकडे आणि प्राथमीक  शुश्रुषा याकडे दुर्लक्ष झालेली जनावरे या रोगामुळे जास्त दगावु शकतात.

साधारण १० टक्केच जनावरांनाच गंभीर स्वरुपाचा लम्पी आजार होतो. या रोगामुळे जनावरे दगावण्याच प्रमाण फक्त २ ते ३ टक्के आहे. त्यामुळे लम्पीग्रस्त जनावर तात्काळ वेगळी करण आणि  रोगावर वेळेवर उपचार आणि शुश्रुषा म्हणजेच नर्सींग होण अत्यंत गरजेच आहे हे लक्षात घेतल पाहीजे.  याशिवाय देशी गोवंश वर्गातील जनावरांची कातडी पातळ असल्यामुळे या जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव जास्त आहे. काही पशुपालक लम्पी झालेल्या जनावराला लगेच वेगळ करत नाहीत त्यामुळेही हा रोग झपाट्याने वाढतोय.

आपल्याकडे जनावरांला पुरवला जाणार आहार तितका चांगल्या दर्जाचा नसतो. चाऱ्याची कमतरता आणि पशुखाद्याचा आभाव या कारणामुळे ही जनावरांची प्रतिकारशक्ती आजाराचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम राहत नाही. तसच एकदा लसीकरण केलं की झालं अस काही पशुपालकांना वाटत.  पण तस नसून जनावरांला एकदा लस दिली की त्याचा प्रभाव ९ ते १२ महिन्यापर्यंत राहतो. त्यामुळे वर्षाला लसीकरण करण अत्यंत आवश्यक आहे.

असं मत पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी व्यक्त केले. एकूणच लसीकरण, वेळेवर उपचार आणि जनावरांची योग्य काळजी घेतली तर लम्पी बरा होतो. त्यामुळे सध्या तरी लम्पीचा नविन व्हेरीयंट आलाय असं म्हणन घाईच ठरेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com