

Nellore cattle breed : उत्पादनाची गुणवत्ता, प्रतिकूल वातावरणात तग धरुन राहण्याची क्षमता अशा विविध कारणांमुळे अलीकडे संकरित जनावरांपेक्षा जातिवंत जनावरांना अधिक महत्व दिलं जातं. त्यामुळेच जातिवंत जनावरांच संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी जनजागृती होऊ लागली आहे.
जगभरात विविध जातींच्या गायी अढळतात. साधारणपने दुधउत्पादन (Milk Production), आरोग्य, वय, जात, वेत यानूसार गायीची किंमत ठरवली जाते. मात्र एखाद्या गायीचा १४ लाख ४० हजार डॉलर किंमत मिळाल्याच तुम्ही कधी एकल आहे का? कारण ब्राझील देशामध्ये भारतीय गोवंशाच्या (Indian Cattle Breed) नेलोर गायीला चक्क १४ लाख ४० हजार डॉलर किंमत मिळाली आहे. त्यामुळे ही गाय जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे.
या गायीचे नाव व्हियाटिना-१९ एफआयव्ही मारा एमोविस असं आहे. ब्राझीलमधील अरंडू येथे झालेल्या लिलावात या गायीला १४ लाख ४० हजार डॉलर एवढी विक्रमी किंमत मिळाली. ही गाय व्हाईट हाऊस फार्मिंग या कंपनीच्या मालकीची होती.
या गायीचे वय सध्या साडेचार वर्ष असून ती जेव्हा दीड वर्षांची होती तेंव्हाच गायीची अर्धी मालकी सुमारे ८ लाख डॉलरला विकली गेली होती, जी त्यावेळी विक्रमी ठरली होती. आता या गायीने स्वत:च्याच किंमतीचा विक्रम मोडला आहे.
यातून ब्राझीलच्या बाजारपेठेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलोर गायीचे अनुवांशिक महत्त्व आणि तीचे मूल्य अधोरेखित होते. उत्कृष्ट जनुकीय वैशिष्ट्ये असलेल्या उच्च गुणवत्तेच्या प्राण्यांना वाढती मागणी आहे आणि त्यासाठी वाट्टेल तेव्हडी किंमत मोजायला ग्राहक तयार असतात.
नेल्लूर किंवा नेलोर या गोवंशाचे उगमस्थान भारतातील तामीळनाडू राज्यातील नेल्लूर येथील आहे आहे. त्यामुळे या गोवंशाचे नाव नेलोर असे ठेवण्यात आले. भारतातून हा गोवंश ब्राझीलला पोहोचला, तेथून या गोवंशाचा स्थानिक प्रजातींशी संकर करून, संकर आणि निवड या दोन्ही पद्धतीने सध्याच्या नेलोर गोवंशाची निर्मिती केली गेली.
आज हा ब्राझीलचा सर्वात जास्त प्रमाणात वापरला जाणारा मुख्य गोवंश आहे. याचा प्रमुख वापर मांसाहारासाठी केला जातो.नेलोर जातीच्या गायी पांढऱ्या रंगाच्या, काटक, निरोगी आणि भरल्या अंगाच्या असतात. त्यामुळे त्या अतिशय सुंदर दिसतात.
थंडी वगळता, उष्ण, दमट, कोरड्या किंवा इतर प्रतिकूल वातावरणात हा गोवंश तग धरुन राहतो. जाड कातडीमुळे रक्तशोषक किडींना न बाधणारा हा गोवंश आहे. उत्तम पचनक्षमता असल्यामुळे खास विशिष्ट प्रकारचा खुराक नाही दिला तरी चालतो.
उत्तम प्रजोत्पादन क्षमता असते. उत्तम चविष्ट मांस मीळते याशिवाय शांत, लाजाळू आणि वात्सल्यपूर्ण स्वभाव असतो.
ब्राझील मधून हा गोवंश अर्जेन्टिना, पेराग्वे, व्हेनेझुएला, मध्य अमेरिका, मेक्सिको, उत्तर अमेरिका सहित अनेक मांसाहारी देशात निर्यात केला जातो. यामुळे नेलोर गोवंश ब्राझीलच्या पशुधनात एक मनाचा गोवंश ठरला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.