
Solapur News : जिल्ह्यात पशुगणनेचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता काम संपविण्यास आठ दिवसांचा कालावधी राहिला आहे. अद्याप १९१ गावांतील काम अपूर्ण आहे. त्यामुळे मुदतीत उर्वरित १३ टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान पशुसंवर्धन विभागासमोर आहे.
जिल्ह्यात २५ नोव्हेंबरपासून पशुगणनेच्या कामाला सुरवात झाली आहे. आधी हे काम संपवण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत होती. त्या मुदतीत काम पूर्ण न झाल्याने केंद्र सरकारने ३१ मार्चपर्यंत मुदत वाढविली होती.
या कालावधीत जिल्ह्यात पशुगणनेचे ८७ टक्के काम झाले आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. या कालावधीत जिल्ह्यात ८६ टक्के गावांत व ८८ टक्के गावांत हे काम मार्गी लागले आहे.
सर्वाधिक मंगळवेढा तालुक्यातील
जिल्ह्यातील १५५ गावांतील व ३६ वॉर्डातील अशी एकूण १९१ ठिकाणचे काम अपूर्ण आहे. यात अक्कलकोट ३, माढा ९, बार्शी १६, करमाळा ११, पंढरपूर १४, दक्षिण सोलापूर १४, उत्तर सोलापूर ६ गावे, मोहोळ २२ गावे, ६ वॉर्ड, सांगोला ११ गावे, ११ वॉर्ड, माळशिरस २५ गावे, १९ वॉर्ड, मंगळवेढा २४ गावांचा समावेश आहे. तेथील कामही या कालावधीत मार्गी लावण्यात येणारअसल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले.
पशुगणना पूर्ण झालेली तालुकानिहाय गावे
अक्कलकोट १८०
माढा १४३
बार्शी १७६
करमाळा १२९
पंढरपूर १०७
दक्षिण सोलापूर ७७
उत्तर सोलापूर ३३
मोहोळ १०४
सांगोला ९४
माळशिरस १३४
मंगळवेढा ६६
एकूण १२४३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.