Livestock Census : पशुगणनेचे ८५ टक्के काम पूर्ण

Animal Care : जिल्ह्यात पशुगणनेचे एकूण ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता केंद्र सरकारने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
Livestock Census
Livestock Census Agrowon
Published on
Updated on

Solapur News : जिल्ह्यात पशुगणनेचे एकूण ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता केंद्र सरकारने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील पशुगणना अंतिम टप्प्यात असून या मुदतीत १०० टक्के काम पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विशाल येवले यांनी दिली.

सोलापूरसह देशभरात १ नोव्हेंबरपासून पशुगणनेला सुरवात झाली. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे महाराष्ट्रात प्रत्यक्ष गणनेला सुरवात होण्यास महिनाभराचा विलंब झाला. २५ नोव्हेंबरपासून पशुगणनेच्या कामाला सुरवात झाली.

Livestock Census
Livestock Census : पशुगणनेसाठी प्रगणकांची संख्या तोकडीच

हे काम संपवण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. केंद्र सरकारने ती ३१ मार्चपर्यंत म्हणजे महिनाभर वाढविली आहे. दरम्यान, सोलापूर सोलापूर जिल्ह्यात पशुगणनेचे एकूण काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. गावांतील ६५ टक्के पशुगणना झाली असून कुटुंब संख्या पाहिल्यास हे काम १२० टक्के झाले आहे.

गायींची संख्या वाढणार

पशुगणनेची आकडेवारी पाहता सोलापूर जिल्ह्यात गायींची संख्या वाढण्याची शक्यता आहे, तर म्हशींची संख्या १५ ते २० टक्के घटणार असल्याचे दिसत आहे. अद्याप दीड ते दोन लाख शेळ्या - मेंढ्यांची गणना बाकी असल्याचे उपायुक्त येवले यांनी सांगितले.

Livestock Census
Livestock Census: देशात पशुगणनेच्या कामाला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

१४३८ गावे, वॉर्डात काम प्रगतिपथावर

जिल्ह्यात १ हजार १३७ गावे, नागरी भागातील ३२३ वॉर्ड अशी १ हजार ४६० गावे व वॉर्ड आहेत. त्यात ग्रामीण भागात ५ लाख ८५ हजार ३९६ तर नागरी भागात २ लाख ८७ हजार ८३३ अशी एकूण ८ लाख ७३ हजार २२९ कुटुंब आहेत. त्यापैकी १४३८ गावे व वॉर्डात काम प्रगतिपथावर आहेत. ग्रामीणमधील ६ व नागरी भागातील १६ वॉर्ड अशा २२ ठिकाणी अद्याप काम सुरू नाही.

तालुकानिहाय काम पूर्ण झालेल्या कुटुंबांची संख्या

बार्शी ८३,६३९

अक्कलकोट ६२,३९०

सांगोला ५८,३११

मोहोळ ४१,८०५

करमाळा ५०,६४५

द. सोलापूर ४९,३९०

माढा ६४,२३७

मंगळवेढा ३०,१४६

पंढरपूर ७९,४६५

माळशिरस ७३,३५३

उत्तर सोलापूर २,८०,३३४

एकूण ८,७३,७१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com