Indigenous Cow : बारामतीमध्ये देशी गोवंश सुधारणा प्रकल्पाचे शनिवारी उद्‌घाटन

पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र हा देशी गोवंश आणि म्हशींमधील दूध उत्पादन वाढीचा उद्देश ठेवून राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि टाटा ट्रस्ट यांच्या वतीने उभारलेला प्रकल्प आहे.
Indigenous Cow
Indigenous CowAgrowon

Animal Care बारामती, जि. पुणे ः ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (Agriculture Development Trust) संचलित भारतातील पहिल्या देशी गोवंश (Indigenous Cow) सुधारणा प्रकल्पासोबतच भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेचे उद्‌घाटन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते शनिवारी (ता. ११) होणार आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली.

Indigenous Cow
Animal Care : पशुवैद्यकीय सुविधांसाठी दबाव गट सक्रिय करावा लागेल

पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र हा देशी गोवंश आणि म्हशींमधील दूध उत्पादन वाढीचा उद्देश ठेवून राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि टाटा ट्रस्ट यांच्या वतीने उभारलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पशुपालकांना दुधाळ जनावरांची उत्पादकता वाढ, पशुपोषण, पुनरुत्पादन, पशुरोग निदान, खाद्य तपासणी आणि विस्तार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Indigenous Cow
Animal Care : जनावरांतील प्रजनन संस्थेच्या आजाराची लक्षणे कशी ओळखायची?

या ठिकाणी उच्च तंत्रज्ञान युक्त अशा डेअरी फार्मची उभारणी करण्यात आली आहे. कृत्रिम रेतन, भ्रूण प्रत्यारोपणाची सुविधा, उच्च उत्पादकता वंशावळ असणारे वळूंच्या रेतमात्रांचा पुरवठा, देशी गोवंशातील दुधाळ जनावरांच्या संतुलित पोषणाविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या ठिकाणी पशू आहारशास्त्र प्रयोगशाळा, रोगनिदान प्रयोगशाळा आणि जनुकीय तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त प्रकल्पामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष पशू व्यवस्थापन तसेच विविध आधुनिक यंत्रणा हाताळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

विद्यापीठातील शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन संबंधित कंपन्यांतील तज्ज्ञांना देखील या प्रकल्पाचा फायदा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आणि प्रकल्प प्रमुख डॉ. धनंजय भोईटे यांनी दिली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com