Animal Diseases
Animal DiseasesAgrowon

Animal Care : जनावरांतील प्रजनन संस्थेच्या आजाराची लक्षणे कशी ओळखायची?

मादी जनावरांमध्ये प्रजनन संस्थेचे आजार होतात. ते आजार लवकर लक्षात येत नाहीत. त्यामुळे बर्‍याचदा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.तसेच महागडा औषधोपचार करूनही हे आजार पूर्णपणे बरे होत नाहीत.
Published on

मादी जनावरांमध्ये प्रजनन संस्थेचे (Reproductive system) आजार होतात. ते आजार लवकर लक्षात येत नाहीत. त्यामुळे बर्‍याचदा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.तसेच महागडा औषधोपचार करूनही हे आजार पूर्णपणे बरे होत नाहीत.

त्यामुळे अशा आजारांची लक्षणे ओळखून पशुवैद्यकाच्या साह्याने उपचार करणे गरजेचे असते. गाईच्या जननेंद्रियाचे आजार आणि त्यांची लक्षणे काय आहेत याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.   

१) गर्भाशयाचा दाह 

गर्भाशयातून पू येणे त्याचा कुजट वास येणे. गर्भाशय मोठे व मऊ होणे. वार पूर्णपणे न पडणे व गाय वारंवार उलटणे. 

२) इन्फेक्शीयस बोवाईन रिनोट्रायकीयासीस  

एकाकी ताप चढणे, नाकातून चिकट स्त्राव येणे, ढासने,  योनीमार्गात पूवाच्या गाठी तयार होणे. डोळे लाल होणे. गर्भपात होणे. वारंवार उलटणे. 

Animal Diseases
Animal Care : ओळखा जनावरांतील पिन्नस आजाराची लक्षणे

३) व्हीब्रीओसीस  

चार ते पाच महिन्याचा गर्भपात होणे. वारंवार उलटणे, गाभ उशिरा धरणे. माज न दाखविणे. 

४) लेप्टोस्पायरोसीस 

एकाएकी ताप चढणे. भूक मंदावणे. कोणत्याही कालावधीत गर्भपात होणे. तांबडी लघवी होणे. अशक्तपणा जाणवणे. चिकट दूध येणे. 

Animal Diseases
Animal Care : ओळखा उरमोडी आजाराची लक्षणे

५) ब्रुसोलोसीस 

६ ते ७ महिन्याचा गर्भपात होणे. वार व्यवस्थित न पडणे, वारंवार उलटणे, गर्भाशयाचा दाह वाढणे. 

६) ट्रायकोमोनीओसीस 

२ ते ३ महिन्याचा गर्भपात होणे, गर्भाशयाचा दाह होऊ पु तयार होणे. अनियमित माज दाखविणे, वारंवार उलटणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com