डीप लिटर पद्धतीचे फायदे

गादी पद्धतीमध्ये भाताचे तूस किंवा शेंगाची टरफले, लाकडाचा भुसा जमिनीवर टाकला जातो. हा थर साधारणपणे ६ इंच जाडीचा असतो. या गादीवरच कोंबड्या मोकाट सोडल्या जातात. या पद्धतीला डिप लिटर असे म्हटले जाते.
Agrowon
AgrowonDeep Litter method in poultry farming
Published on: 
Updated on: 

गादी पध्‍दतीमध्ये (deep litter) जमिनीवर बेडिंग मटेरीअल (bedding material) म्हणून लाकडाचा भुसा, शेंगाची टरफले, भाताचे तूस वापरले जातात. कोंबडयाची विष्‍ठा लिटरवर पडल्याने विष्ठेतील आर्द्रता शोषली जाते. या पद्धतीत लिटर (litter) दररोज वर खाली केले जाते. जेणेकरून त्यातील अमोनिया निघून जाण्यास मदत होते. लिटरमधील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास, त्यामध्ये चुना (lime) मिसळला जातो. त्यामुळे लिटर कोरडे राहण्यास मदत होते.

या पद्धतीत सर्व कोंबड्या मोकळ्या सोडल्या जातात. विष्ठा लिटरमध्येच पडत असल्याने, कुजलेल्या लिटरचे खतामध्ये रुपांतर होते. ५० कोंबड्यापासून साधारणपणे एक टन कोंबडी खताची निर्मिती होते.

Agrowon
ही कोंबडी ठरली आदिवासींचा आधार !

डीप लिटर सिस्टीम ही पद्धत आर्थिकदृष्ट्या सोयीची असते. या पद्धतीत पक्षांना स्वच्छ, आरामदायक वातावरण मिळत असते. एका पक्षाला सुमारे १ ते २ चौरस फूटापर्यंत जागा मिळते. पक्षांची कार्यक्षमता चांगली राहते.

Agrowon
अंडी उत्पादनाला कोणती कोंबडी चांगली?

डीप लिटर पद्धतीमध्ये कमी जागेत भरपूर कोंबड्या पाळता येतात. या पद्धतीत कोंबड्यांचे मांस उत्पादन चांगले मिळते. मात्र डीप लिटर पद्धतीत मनुष्यबळ जास्त लागते. लिटरमधील ओलावा वाढल्याने कोंबड्यांना संसर्गजन्य रोगाची बाधा होण्याची शक्यता वाढते. डीप लिटर पद्धतीत कोंबड्यामध्ये जीवनसत्त्व –ई ची कमतरता दिसून येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com