ही कोंबडी ठरली आदिवासींचा आधार !

सातपुडा पर्वतरांगेतील आदिवासी लोकांच्या आयुष्यात तेथील पिक आणि वृक्षाबरोबर येथील सातपुडा कोंबडीचे स्थानही महत्त्वाचे आहे.आदिवासी, जंगले आणि पर्वतरांग हे जणू एकमेकांस पूरक समीकरणच म्हणता येईल. या जंगलाचे पालन पोषण आदिवासी लोकांनी करावे आणि त्या बदल्यात त्यांचे पालनपोषन या पर्वतांनी करावे.
satpuda kombdi
satpuda kombdi

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांग (satpuda range hills) ही महाराष्ट्र (Maharshtra), गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडते. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील घाट म्हणजे सह्याद्री पर्वत हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट (biodiversity hotspot) आहे. उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगेत विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी-पक्षी आढळून येतात. सोबतच या पर्वतरांगेत जगाच्या पाठीवर दुर्मिळ होत चाललेली जंगली कुरणेही दिसून येतात. या भागात आदिवासी लोकांचे वास्तव्य दिसून येते. आदिवासी, जंगले आणि पर्वतरांग हे जणू एकमेकांस पूरक समीकरणच म्हणता येईल. या जंगलाचे पालन पोषण आदिवासी लोकांनी करावे आणि त्या बदल्यात त्यांचे पालनपोषन या पर्वतांनी करावे.  या आदिवासी लोकांच्या जगण्यासाठीच्या गरजा कमी असल्या तरी त्यात निसर्गाचा वाटा जास्त आहे. येथील आदिवासी लोकांच्या आयुष्यात तेथील पिक आणि वृक्षाबरोबर येथील सातपुडी कोंबडीचे (satpudi poultry) स्थानही महत्त्वाचे आहे. हेही वाचा- मासे खारवून टिकवण्याची पद्धत बाएफ येथील तज्ज्ञांनी सातपुडी कोंबड्यांच्या शारीरिक गुणधर्माची नोंदणी केली आहे. या कोंबडीचा वाढीचा वेग चांगला असून, अधिक अंडी देण्याची उत्पादनक्षमता आणि चांगली रोगप्रतिकारशक्ती असल्यानं परसातील कुक्कुटपालनासाठी ही जात योग्य आहे. हेही वाचा- कसा करायचा रानडुक्करांचा बंदोबस्त ? आदिवासी लोक घरच्या कोणत्याही शुभ कार्यक्रमात किंवा सामूहिक कार्यक्रम साजरा करताना या कोंबड्यांचा नैवैद्यासाठी उपयोग करतात. कोंबडी हे त्यांच्या उदरनिर्वाहासाठीचे एक उत्तम साधन म्हणता येईल. हेही पाहा- रानडुकरांच्या त्रासापासून मुक्ती!  या परिसरात विविध शारीरिक गुणधर्म असलेल्या, एकमेकांपासून भिन्न असे सातपुडी कोंबड्यांचे प्रकार दिसून येतात. या सर्वांना कोंबड्यांना स्थानिक लोक सातपुडी नावाने ओळखतात.   मग यातील खरी स्थानिक कोंबडी कशी ओळखायची ? हा प्रश्न स्थानिक लोकांना विचारल्यास ते म्हणतात, मिश्र रंगाची, मध्यम उंचीची, तपकिरी रंगाचे डोळे आणि आखूड पायांची कोंबडी म्हणजे सातपुडी कोंबडी होय.

फार पूर्वीपासून हे लोक जी कोंबडी पाळत होते, त्या आणि आजच्या कोंबडीत इतकी विभिन्नता कशी? याचं उत्तर देताना ते म्हणाले की, पूर्वी लग्न समारंभात मुलीची सासरी पाठवणी करताना सोबत गायी, शेळ्या, कोंबड्या देण्याची प्रथा होती आणि या कारणामुळे इतर भागातील कोंबड्यांचे प्रमाण या भागात वाढल्याचे दिसून येते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com