थोडक्यात माहिती..१. अझोला ही प्रथिनयुक्त, जलद वाढणारी पाणवनस्पती असून पशुखाद्यासाठी स्वस्त पर्याय आहे.२. लहान खड्ड्यात (२x२ मी.) माती, गाईचे शेण स्लरी व पाणी टाकून सहज लागवड करता येते.३. नियमित शेण, सुपर फॉस्फेट व सूक्ष्म अन्नद्रव्ये दिल्यास उत्पादन चांगले मिळते.४. लागवडीपासून १०-१५ दिवसांनी रोज ५००-६०० ग्रॅम काढणी करता येते.५. २०–२८°C तापमान व ५०% सूर्यप्रकाशात अझोलाची उत्तम वाढ होते..Azolla for Cattle: अझोला ही पाण्यात वाढणारी वनस्पती आहे. तिच्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यासारखे पोषकतत्त्व असतात. अझोलाचे उत्पादन कमी जागेत आणि कमी खर्चात घेता येते त्यामुळे पशु आहारासाठी अझोला हा खूप चांगला पर्याय आहे..अझोलाचे उत्पादनअझोला शेवाळासारखी पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. त्याची वाढही फार भराभर होते. साधारणत: अझोला तांदळाच्या शेतात किंवा उथळ पाण्याच्या जागी उगवता येतो. .बेडची बांधणीजमीन सारखी व स्वच्छ करुन घ्यावी. आयताकार स्वरूपात विटा आडव्या रचाव्यात. विटांनी तयार करण्यात आलेल्या आयाताकाराच्या मार्जिनला झाकणारी २ मीटर बाय २ मीटर मापाची एक पातळ यूव्ही स्टॅबिलाइज्ड शीट टाकावी. १० ते १५ किलो चाळून बारीक माती सिल्प्यूलाईन पिटमध्ये टाकावी. त्यानंतर २ किलो शेणाची स्लरी तयार करावी. त्यात ३० ग्रॅम सुपर फॉस्फेट १० लिटर पाण्यात मिसळून, शीटवर टाकावे. पाण्याची पातळी १० सेमी. वाढविण्यासाठी आणखी पाणी टाकावे. त्यावर सुमारे ०.५ ते १ किलो शुध्द मदर अझोला बेड वर सर्वत्र पसरावा..पशुखाद्यातून जनावरांना द्या अझोला.बेडचे नियोजन२० ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि सुमारे १ किलो गाईचे शेण ५ दिवसांत एकदा मिसळावे. ज्यामुळे अझोलाची लवकर वाढ आणि रोजची ५०० ग्रॅमची उपज कायम राहील.मायक्रोन्यूट्रिंट मिक्स यामध्ये मॅग्नेशिअम, लोह, तांबे, गंधक इत्यादी देखील आठवड्यातून एकदा मिसळावे म्हणजे अझोलातील खनिज घटकांची वाढ होईल.३० दिवसांतून एकदा, सुमारे ५ किलो बेड माती नवीन मातीने बदलून टाकावी, यामुळे नत्राची वाढ आणि सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता यांच्यावर उपाय होईल.बेडमधील २५ ते ३० टक्के पाणी दर १० दिवसांनी बदलावे. बेड स्वच्छ ठेवावा. दर सहा महिन्यांनी पाणी व माती बदलावी आणि अझोला लावावा.जेव्हा कीटक किंवा रोग लागणे सुरु होईल तेव्हा अझोलाच्या शुध्द कल्चरने युक्त असा ताजा बेड लावावा.सध्या अझोलाच्या प्रायोगिक उत्पादनासाठी उच्च प्रतीच्या एच.डी.पी.इ. व एल.डी.पी.ई. यांच्या ५ थरांचे लॅमिनेशन करुन आय.एस.आय. मानांकनानुसार बनविलेल्या कापडातून बनविलेला हौद (बेड) बाजारात मिळतो..काढणी करणे- अझोलाची वाढ झपाट्याने होते. १०-१५ दिवसांत हौद भरून जातो. त्या वेळेपासून, ५००-६०० ग्रॅम अझोलाची काढणी दररोज होऊ शकते.१५ व्या दिवसापासून एखाद्या चाळणी किंवा ट्रेच्या मदतीने अझोला काढावे.काढणी केलेला अझोला ताज्या पाण्याने धुतल्यावर गाईच्या शेणाचा वास निघून जाईल..वाढीसाठी पर्यावरण घटकअझोला २०ते २८ सेल्सियसच्या तापमानात चांगला वाढतो. शिवाय ५० टक्के पूर्ण सूर्यप्रकाश असावा. सावलीची जाळी वापरुन प्रकाशाची तीव्रता कमी करता येईल. अझोलाची बेडमधील गर्दी टाळण्यासाठी अझोला बायोमास दररोज काढून जनावरांना खाऊ घालावा.पर्यायी वस्तूताज्या बायोगॅस स्लरीचा वापर केला जाऊ शकतो.न्हाणीघर आणि गोठ्यातील सांडपाणी हौद भरण्यासाठी वापरले जाऊ शकते. ज्या क्षेत्रांत ताज्या पाण्याचा अभाव आहे तेथे कपडे धुतल्यानंतर उरलेले पाणी (दुसऱ्यांदा खंगाळलेले) देखील वापरले जाऊ शकते..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs): प्र.१. अझोला वाढायला किती दिवस लागतात? साधारण १०–१५ दिवसांत खड्डा भरतो व रोजची काढणी सुरू होते.प्र.२. अझोलाचा उपयोग कशासाठी होतो? प्रथिनयुक्त पशुखाद्य व सेंद्रिय खत म्हणून वापर होतो.प्र.३. अझोला वाढण्यासाठी कोणते वातावरण चांगले आहे? २०–२८°C तापमान, अर्धवट सूर्यप्रकाश व स्वच्छ उथळ पाणी.प्र.४. दररोज किती अझोला मिळू शकतो? प्रत्येकी २x२ मीटर बेडमधून ५००–६०० ग्रॅम.प्र.५. ताजे पाणी नसेल तर अझोला कसा उगवता येईल? बायोगॅस स्लरी, घरगुती सांडपाणी किंवा धुतलेल्या कपड्यांचे पाणी वापरता येते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.