Animal Rabies : जनावरांतील रेबीज रोगाची लक्षणे कशी ओळखाल?

कुत्रा चावल्यामुळे लाईसा व्हायरस या विषाणूमुळे जनावरांमध्ये रेबीज हा रोग होतो.
Animal Rabies
Animal RabiesAgrowon
Published on
Updated on

जनावरांमध्ये प्रामुख्याने गाय, म्हैस, बैल, शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये पिसाळणे ही विकृती कुत्रा चावल्यामुळे होते. कुत्रा चावल्यामुळे लाईसा व्हायरस (Liasa Virus) या विषाणूमुळे जनावरांमध्ये रेबीज (Rabies) हा रोग होतो. रेबीज झालेल्या जनावराच्या लाळेतून, कच्च्या दुधातून, कच्च्या मांसातून रेबीजचा प्रसार होतो. रेबीज रोग कसा होतो, त्याची लक्षणे (Symptoms), उपचार आणि घ्यायची काळजी याविषय़ी ताकविकी, ता. जि. उस्मानाबाद येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रविण पतंगे (Dr. Pravin Patange) यांनी दिलेली माहिती पाहुया.

Animal Rabies
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करा

रेबीज होतो कसा?

पिसाळलेल्या जनावरांच्या चाव्यातून लाळेद्वारे विषाणू जनावरांच्या मांसपेशीत प्रवेश करतात. मांसपेशीतील मज्जातंतूमध्ये विषाणू त्यांची संख्या वाढवतात आणि मेंदूपर्यंत पोहोचवतात. वाढलेली विषाणूंची संख्या मज्जातंतूंना कुजवते आणि विविध प्रकारच्या मांसपेशींना सैल बनवते. श्वसनसंस्थेच्या मांसपेशी सैल झाल्यामुळे जनावराला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि जनावर दगावते. 

रेबीज ची लक्षणे 

रेबीज रोगामुळे जनावर आक्रमक होते आणि मलुल बनते. जनावरांच्या मेंदू व चेतासंस्थेवर झालेल्या विकृतीमुळे जनावर झाडावर किंवा भिंतीवर डोके आपटते. जबड्याच्या मांसपेशी सैल पडल्याने जनावर सतत गाळ गाळते. गळ्याच्या आणि जबड्याच्या मांसपेशी सैल पडल्याने जनावर पाण्याला घाबरते किंवा पाण्याची भिती निर्माण होऊ लागते. जनावर माणसावर किंवा निर्जीव वस्तूंवर चाल करून जाते. जनावर सतत लघवी करते व शेण टाकते. जनावराची भूक मंदावते. दात खाते. दूध उत्पादनात घट होते. 

Animal Rabies
या प्रकारात रेबीज झालेला कुत्रा ओळखणे अवघड जाते! | Symptoms of Rabies Disease | ॲग्रोवन

उपचार काय आहेत ?

श्वानदंशामुळे रेबीज होतो म्हणून कुत्रा चावल्यावर लगेच  प्रतिबंधात्मक उपाय करावे. चावलेली जागा स्वच्छ पाणी आणि साबणाने स्वच्छ धुवावी. जखमेवर संसर्ग टाळण्यासाठी हळद आणि आयोडीन लावावे. रेबीज या रोगावर उपचारात्मक औषध नाही म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी जनावराला रेबीज प्रतिबंधात्मक लस कुत्रा चावलेल्या तिसऱ्या सातव्या चौदाव्या आणि नवोदया दिवशी टोचून घ्यावी. धनुर्वात प्रतिबंध लस टोचून घ्यावी. 

घ्यायची काळजी 

रेबीज झालेले जनावर इतर जनावरांपासून दूर बांधावे संसर्गित जनावरांचा चारा पाणी वेगळे ठेवावे संसर्गित जनावरांच्या नैसर्गिक स्त्रावांशी जसे की लाळ, लघवी, डोळ्यातील पाणी यांच्या संपर्कात स्वतः आणि इतर जनावरांना येऊ देऊ नये. दगावलेल्या जनावरांचे मलमूत्र, चारा, पाणी आणि मृत अवशेष यांची योग्य ती विल्हेवाट लावावी. पाळीव कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com