
Goat Breeding : कमी खर्च, जास्तीचे उत्पन्न, बाजारात शेळीच्या मांसाला असेलेली मागणी असे शेळीपालन व्यवसायाचे अनेक फायदे आहेत. पण त्यासाठी शेळ्यांच्या प्रजनन व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अवश्यक आहे. शेळ्यांतील प्रजनन व्यवस्थापनामध्ये शेळ्यांतील एकत्रित माज पद्धत फायदेशीर आहे.
शेळ्यांच्या एकत्रित माज पद्धतीमध्ये योग्य व्यवस्थापन ठेवून शेळ्या एकाच वेळी माजावर आणल्या जातात. या शेळ्यांमघ्ये ठरलेल्या वेळी नैसर्गिक पद्धतीने किंवा कृत्रिम पद्धतीने रेतन केले जाते. यामुळे शेळयामधील प्रजनन व्यवस्थापन सुरळीत होतं आणि दोन वर्षाला तीन वेत निश्चितपणे मिळतात. त्यामुळे शेळीपालन व्यवसाय फायदेशीर होण्यास मदत होते.
शेळीतील माजाची लक्षणे
शेळ्यांच्या एकत्रित माज पद्धतीमध्ये गोठ्यातील शेळ्या एकाच वेळी माजावर येतील असं निोजन करण गरजेच आहे त्यासाठी शेळ्यातील माजाची लक्षणे ओळखण गरजेच आहे. शेळीतील माजाचे चक्र दर २१ दिवसांनी येते. शेळी माजावर आल्यानंतर शेळी अस्वस्थ होते, सतत ओरडते, शेपटी हलवते, खाद्य खाणे कमी करते. शेळ्यांच्या योनी मार्गातून चिकट स्त्राव येतो. हा माजाचा कालावधी हा ३० ते ३६ तासाचा असतो. शेळ्यामध्ये अशी लक्षणे दिसल्यानंतर रेत करावे.
शेळ्यांतील एकत्रित माज पद्धत
गोठ्यातील शेळ्यांचे आधी गट तयार करावेत. यामध्ये वयात आलेल्या शेळ्यांचा गट, विलेल्या शेळ्यांचा गट, वांझ शेळ्यांचा गट तयार करावा. शेळीचे किमान वय ८ ते १० महिन्यांत ३० किलो झाले पाहिजे. या वेळेस शेळी पहिला माज दाखवते; मात्र पहिले दोन माजामध्ये रेतन न करता सोडून द्यावेत. निरोगी उत्पादनक्षम शेळ्यांना एकत्रितपणे एकदाच माजावर आणून या शेळ्यांमध्ये ठरलेल्या वेळी नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतन करावं. यामुळे शेळयामधील प्रजनन व्यवस्थापन सुरळीत होतं आणि दोन वर्षाला तीन वेत निश्चितपणे मिळतात.
शेळ्यांतील प्रजनन यशस्वी होण्यासाठी सशक्त नर बोकड उपलब्ध असणं गरजेचे आहे. याशिवाय प्रजननक्षम शेळ्यांना वेळापत्रकानूसार लसीकरण करावं. शेळ्यांना ठरावीक कालावधीनंतर जंतनाशकाची मात्रा द्यावी. शेळ्यांना समतोल आहार पुरवावा यामध्ये प्रथिनयुक्त किंवा पौष्टिक आहाराचा पुरवठा करावा. शेळ्यांना मोड आलेले धान्य आणि क्षार मिश्रण द्यावीत. शेळ्यांमध्ये एकत्रित माजाकरिता प्रोजेस्टेरॉन संप्रेरकाचा वापर केला जातो. त्यासाठी पशुवैद्यकाडूनच कृत्रीम रेतन करुन घ्यावं. शेळीपालन मुख्य व्यवसाय म्हणून करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पण हा शेळीपालन व्यवसाय शास्त्रीय दृष्टिकोन ठेऊन केला तरच हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. यामध्ये शेळ्यांतील एकत्रित माज पद्धत फायदेशीर आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.