Animal Disease : जनावरांमधील शिंगाचा कर्करोग

Animal Horn Cancer : बैलाच्या शिंगाला कर्करोग झाला आहे, त्या बाजूच्या नाकपुडीतून रक्तमिश्रित स्राव येतो. कर्करोग झालेले शिंग एका बाजूला झुकते किंवा वाकडे होते.
Animal Horn Cancer
Animal Horn CancerAgrowon
Published on
Updated on

Animal Care :

डॉ. मोहम्मद अली, डॉ. जी. एस. खांडेकर, डॉ. एस. व्ही. गायकवाड

बैलांमधील गंभीर समस्या म्हणजे शिंगाचा कर्करोग. स्क्वेमस सेल कार्सिनोमा हा एक प्रकारचा कर्करोग आहे. शिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील मोठ्या जनावरांना होतो; परंतु वयस्कर जनावरांमध्ये सुद्धा हा रोग आढळतो. कडक उन्हात शेतात विविध कामांसाठी वापरले जाणारे बैल या रोगास बळी पडतात. गाई, म्हशींमध्ये हा रोग कमी प्रमाणात आढळतो.

शेतात उन्हात काम करीत असताना प्रखर सूर्यकिरणांमधील अतिनील किरणांमुळे शिंगाचा कर्करोग होतो. बैलाच्या शिंगास रंग लावला जातो. या रंगातील विषारी पदार्थांमुळे शिंगामध्ये सतत जळजळ होते, त्यामुळे हा रोग होऊ शकतो.

बैल पोळा, शंकरपट, बैलगाडा शर्यत, कर्नाटकी बेंदूर या सणाच्या काळात काही शेतकरी बैलांची शिंगे तासून त्यांना रंग लावतात. बऱ्याचदा जत्रा, जनावरांच्या बाजारामध्ये व्यापार व्यवसाय करणारे लोक बैलाची शिंगे तासून रंग लावतात. याचा मुख्य उद्देश जनावरांचे वय लपवणे हा असतो. परंतु या कारणामुळे जनावरांमध्ये शिंगाचा कर्करोग होऊ शकतो.

Animal Horn Cancer
Animal Disease : जनावरांमधील गोचिड ताप

कारणे

शेती कामासाठी जुंपलेल्या बैलास लाकडी किंवा लोखंडी ५ ते १० किलो वजनाच्या जूमुळे शिंगाच्या पाठीमागच्या बाजूला मानेवर सतत होणारी घर्षणक्रिया.

काही विषाणू या रोगासाठी कारणीभूत ठरतात.

वयस्कर जनावरास हा रोग जास्त प्रमाणात होतो.

शिंगे आकर्षक दिसण्यासाठी व वय लपविण्यासाठी आणि बाजारात जास्त किंमत मिळण्यासाठी तासली जातात, यामुळे शिंगे मृदू होऊन शिंगाला इजा होऊन कर्क रोग होतो.

शिंग बुडास जाड आणि टोकास निमुळते असते. शिंगाचा बाहेरील भाग हा टणक आवरणाने बनलेला असतो, तर आतील भाग पोकळ असून, अनियमित असतो. तो मस्तकाच्या हाडाला जोडलेला असतो. शिंगाचा आतील पोकळ भागातून रोगाची सुरुवात होते. नंतर हा कर्करोग शिंगाचा पोकळ भाग पूर्णपणे व्यापून टाकतो. शिंगाच्या बुडातही पसरतो.

लक्षणे

शिंगास खाज सुटून वेदना होतात. जनावर सतत डोके हलवत असते. जनावर झाडास शिंग घासते किंवा टकरा मारत असते.

कर्करोग झालेल्या शिंगावर हलके स्टेनलेस स्टीलचे उपकरण (फोरसेप्स) मारून पाहिल्यावर त्यातून भद भद आवाज येतो. असा आवाज निरोगी शिंगातून येत नाही, कारण ते शिंग आतून टणक असते.

शिंगाला कर्करोग झाला आहे, त्या बाजूच्या नाकपुडीतून रक्तमिश्रित शिंगाच्या बुडामधूनही स्राव येतो. कर्करोग झालेले शिंग एका बाजूला झुकते किंवा वाकडे होते.

रोगाचे प्रमाण जास्त असल्यास शिंग हलते, थोड्याशा माराने गळून पडते.

शिंग तुटल्यावर त्या ठिकाणी कोबीसारखी कर्करोगाची वाढ दिसते. रक्तस्राव होतो. अशा वाढीवर जिवाणूचा प्रादुर्भाव होतो. यातून दुर्गंधी येते.

कर्करोगाच्या वाढीवर माश्‍या बसून आसडी पडू शकते.

Animal Horn Cancer
Animal FMD Disease : ‘लाळ्या खुरकूत'चा प्रसार रोखा

कर्करोगाचा प्रसार ओळखण्याची खूण

शिंग वाकडे होणे, हलणे, नाकातून स्राव, शिंग घासणे, शिंग दुभंगणे.

‘क्ष’ किरण तपासणीत शिंगाच्या आतील पोकळ भागात पेशींची लवचिक वाढ दिसते.

निश्चित निदान प्रयोगशाळेत कर्करोगाच्या वाढीच्या तपासणीवरून केले जाते.

उपचार

लक्षणे दिसताच तत्काळ पशुतज्ज्ञाशी संपर्क साधून उपचार करावेत.

शस्त्रक्रिया करून शिंग बुडातून कर्करोगासहित काढले जाते. या रोगाचा इतर अवयवात प्रादुर्भाव झाल्यावर शस्त्रक्रियेचा फायदा होत नाही.

कर्करोगावर पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.

कर्करोग टाळण्याचे उपाय

कडक उन्हात बैलांना काम देऊ नये. त्यांना उन्हापासून आराम मिळावा म्हणून निवाऱ्याची सोय करावी.

शक्यतो प्रखर ऊन होणाच्या अगोदर किंवा प्रखर ऊन कमी झाल्यावर शेतातील काम करावे.

शिंगे तासू नये, शिंगांना वॉर्निश (रसायनयुक्त) सारखे रंग लावू नयेत.

बैलांना शेतात काम करताना मानेवरचे जू सतत शिंगावर आदळू नये म्हणून रबराचे आवरण जू वर लावावे. शिंगाच्या बुडामध्ये तेल लावावे.

डॉ. सय्यद मोहम्मद अली, ९५४५०४०१५५

(लेखक पशुशल्य चिकित्सक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com