Gosewa Ayog : राज्यात लवकरच गोसेवा आयोगाची स्थापना : विखे

राज्यात अनेक शेतकरी गोसेवा करत आहेत. उत्कृष्ट गोसेवा करणाऱ्यांचा सरकारकडून गौरव होत आहे. राज्यातही गोसेवा आयोगाची स्थापना होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.
Desi Cow
Desi CowAgrowon
Published on
Updated on

नगर ः राज्यात अनेक शेतकरी गोसेवा (Gosewa) करत आहेत. उत्कृष्ट गोसेवा करणाऱ्यांचा सरकारकडून गौरव होत आहे.

राज्यातही गोसेवा आयोगाची (Gosewa Ayog) स्थापना होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी पुढाकार घेतला आहे. लवकरच राज्यात गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे.

त्यासाठीचा प्रारूप आराखडा तयार झाला असल्याचे पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी नगर येथे सांगितले.

Desi Cow
Lumpy Skin : मृत्यूच्या तडाख्यातून वाचविली शंभर जनावरे

नगर येथे कार्यक्रमासाठी आलेले राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की गोपालन हा शेतकऱ्यांचा मूळ व्यवसाय आहे.

राज्यात, देशात अनेक शेतकरी गाईंची सेवा करतात. अलीकडच्या काळात गाईंच्या दूध, गोमुत्राचे महत्त्व कळू लागले आहे.

सरकार उत्कृष्ट गोसेवा करणाऱ्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय गोसेवा आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली आहे.

Desi Cow
Lumpy Skin : चिपळूणमध्ये ‘लम्पी स्कीन’ने ४४ जनावरांचा मृत्यू

त्यामळे राज्यातही लवकरच गोसेवा आयोगाची स्थापना होण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.

राज्यातही लवकरात लवकर गोसेवा आयोगाची स्थापन होणार आहे. त्याचा प्रारूप आराखडा तयार झाला आहे. शेतकरी हिताचे आणि महत्त्वाचे हे काम माझ्या हातून होणार आहे.

या साठी गोसेवा करणाऱ्या संस्थांनी व पुरस्कार मिळाल्यांनी आयोगाच्या स्थापनेसाठी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा विखे यांनी व्यक्त केली. गोसेवा आयोग स्थापन होणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी गाईपालनाबाबत अधिक प्रोत्साहन मिळणार असल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com