Goat Cluster : रांजणीतील ‘गोट क्लस्टर’ हलवले साताऱ्यातील दहिवडीत

Goat Farming : सांगलीसह सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील मेंढपाळांनी गोट क्लस्टरसाठी (शेळी समूह योजना) गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा केला होता.
Goat Cluster
Goat ClusterAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगलीसह सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील मेंढपाळांनी गोट क्लस्टरसाठी (शेळी समूह योजना) गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा केला होता. त्यानुसार २०२२ मध्ये सांगलीतील रांजणी येथे शेळी-मेंढी महामंडाळाच्या प्रक्षेत्रावर १० एकरावर हा प्रकल्प मंजूर झाला. दरम्यान हा प्रकल्प आता रांजणीऐवजी सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे मेंढी व शेळी पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील मेंढपाळ आणि मेंढपाळ आर्मी संघटना यांनी चार वर्षांपूर्वी रांजणी येथे शेळी समूह योजना सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत एप्रिल २०२२ मध्ये राज्यस्तरीय योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावर शेळी समूह योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

पुणे महसूल विभागातील पाच जिल्ह्यांत हा एकमेव प्रकल्प कवठेमहांकाळ तालुक्‍यातील रांजणी येथे मंजूर करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी-शेळी महामंडळाचे प्रक्षेत्र ७१४ हेक्टरवर विस्तारलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध असून दहा एकरावर उभारण्यासाठी मान्यता दिली होती. यासाठी १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.

Goat Cluster
Goat Farming: महाराष्ट्रातील विविध जातींच्या शेळ्यांची माहिती

मात्र, रांजणीतील हा प्रकल्प अचानक रद्द केल्याचा आदेश कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने काढत सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील मेंढी-शेळी महामंडाळाच्या प्रक्षेत्रावर सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, या प्रक्षेत्राचे क्षेत्र ९० हेक्टर आहे.

त्यापैकी ७० हेक्टरवर तलाव असून उर्वरित २० हेक्टरवर इमारत, रस्ते, चराऊ क्षेत्र, कार्यालय आणि निवासस्थान आहे. वास्तविक, या ठिकाणी दहा एकरावरच हा प्रकल्प सुरू होणार आहे. परंतु या प्रक्षेत्रात अगोदरच जागेची कमतरता असल्याने हा प्रकल्प कसा उभारणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

या प्रकल्पामुळे सुमारे एक हजार रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार होती. शेळी-मेंढी व्यवसाय वाढ, स्थानिक शेळी-मेंढींना बाजारपेढ उपलब्ध होण्यास मदत मिळाली असती. मात्र, दोन वर्षांपासून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणत्याही स्तरावर हालचाली झाल्या नाहीत. याला शेळी-महामंडळ, सरकार कारणीभूत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दहिवडी मध्यवर्ती ठिकाण असल्याची सारवासारव

पुणे महसूल विभागातील पाच जिल्ह्यांना दहिवडी हे मध्यवर्ती आणि जवळचे ठिकाण असल्याने रांजणीची गोट क्लस्टर योजना दहिवडीला सुरू करण्याची मान्यता दिली असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पात काही बदल करणे अपेक्षित होते. त्यामुळे हे बदल करण्यासाठी या प्रकल्पाचे काम थांबले होते. ते काम वेळेत सुरू करता आले नाही, असे कारण दाखवत रांजणीतून हा प्रकल्प दहिवडीला हलवल्याचे सांगत अधिकारी सारवासारव करत आहेत.

Goat Cluster
Goat Farming : निर्जंतुकीकरणासह शेड कोरडे राखण्यावर भर

शेळी-मेंढी महामंडळाची उदासीनता

रांजणी येथील प्रक्षेत्रावर २०२२ मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने गोट क्लस्टर (शेळी समूह योजना) मंजूर केले. त्यासाठी १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर हे काम सुरू होणे अपेक्षित होते.

त्यासाठी शेळी-मेंढी महामंडळानेही पाठपुरावा करणे क्रमप्राप्त होते. त्यातच सत्ता बदल झाल्यानंतर प्रकल्पाची वाच्यताच बंद झाली. मात्र, महामंडाळाच्या उदासिनतेमुळे पुणे महसूल विभागातील हा एकमेव प्रकल्प दोन वर्षे रेंगाळला. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प थेट सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे हलवला.

...असे आहे ‘गोट क्लस्टर’

३० हजार शेळीपालकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित आणि उत्पादक कंपन्या स्थापन करणे

सामूहिक सुविधा केंद्राची स्थापन करून प्रशिक्षण केंद्राची सुविधा

अडीच एकरावर शेळ्यांचे दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया केंद्राची दोन युनिट स्थापना करणे

दीड एकरावर शेळ्यांचे मांस प्रक्रिया केंद्राची स्थापना एक युनिट

अर्धा एकरावर शेळी उत्पादक कंपनी व खासगी व्यावसायिकासाठी कार्यालय

मेंढपाळांच्या मागणीनुसार रांजणी येथे गोट क्लस्टर मंजूर झाले. त्यामुळे जिल्ह्यातील मेंढपाळांना याचा मोठा फायदा होणार होता. मात्र इथले क्लस्टर दहिवडी येथे हलवले आहे, ते योग्य नाही. वास्तविक, हा प्रकल्प इथेच ठेवायला हवा होता. दहिवडी या ठिकाणी स्वतंत्र गोट क्लस्टर उभारणीसाठी शासनाने पुढाकार घेणे अपेक्षित होते.
- अर्जुन थोरात, अध्यक्ष, मेंढापाळ आर्मी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com