Goshala Subsidy : राज्यातील गोशाळांना अनुदान द्या

Goshala In Maharashtra : गोशाळेच्या विकासासाठी शासनाने शंभर कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.
Goshala
Goshala Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News : गोशाळेच्या विकासासाठी शासनाने शंभर कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. मात्र, प्रशासनाने नियमावली तयार न केल्याने एक वर्षांपासून निधी पडून आहे.

यावर तत्काळ कारवाई करून गोशाळांना अनुदान देण्याची मागणी गोशाळा महासंघाने केली आहे. गोशाळा महासंघातर्फे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Goshala
Goshala Subsidy : गोशाळांना मिळणार १५ ते २५ लाख अनुदान

राज्य शासनाने गोशाळा बांधकामाकरिता गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना सुरू केली आहे. यासाठी गोशाळेकडून तसे प्रस्ताव मागविण्यात आले होते. पशुसंवर्धन विभागाने तपासणी केली.

Goshala
Goshala : प्रत्येक गावात गोशाळा सुरू करा

मात्र, अजूनही शासनाने गोशाळांना निधी दिलेला नाही. शासनाने योजनेसाठी शंभर कोटी रुपये मंजूर केले आहे. यात ७० कोटी रुपये गोवर्धन गोवंश सेवा योजना, २० कोटी गोमय मूल्यवर्धन तर दहा कोटी रुपये गोसेवा आयोगासाठी तरतूद केली आहे. पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी नियमावली तयार केली नाही.

यामुळे निधी पडूनच आहे. शासनाने या योजनेकडे लक्ष देऊन योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी गोशाळा महासंघाची आहे. तसे निवेदन महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी मनोज सर्वया, राजेश नीवल, गौरव सूचक, अजय मुंदडा, मोहन राठोड, प्रवीण लोणावत, केतन मजेठीया यांच्यासह जिल्ह्याचे गोशाळेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com