Free Dairy Webinar : दुग्ध व्यवसायातील संधींविषयी शनिवारी विनामूल्य वेबिनार

डॉ. शांताराम गायकवाड यांचे करिअर संधी व स्टार्टअप संबंधी मार्गदर्शन
 Dairy Webinar
Dairy Webinar Agrowon

पुणे : भारतीय ग्राहकांच्या आहारात दुधाचे स्थान महत्त्वाचे असल्याने दुधाला सातत्याने मोठी मागणी असते. देशाची लोकसंख्या वाढ आणि दूध व दुग्धोत्पन्न पदार्थांच्या पोषक गुणधर्मांची जागृती पाहता दुधाच्या मागणीत भविष्यातही सतत वाढ होत राहणार आहे.
सध्या देशात अस्तित्वात असणाऱ्या दुग्ध प्रकल्पातून व देशाबाहेर असलेल्या याच उद्योग क्षेत्रातून वेगवेगळ्या विभागांत कुशल व तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात कायम असणार आहे. हे लक्षात घेता तरुणांना दूध व्यवसायात (Dairy Business) अमाप संधी उपलब्ध आहेत. सहकारी दुग्ध संस्था, दुग्धप्रक्रिया व दुग्ध उत्पादन प्रकल्प, तसेच या व्यवसायासाठी आवश्यक असणारी उपकरणे बनवणाऱ्या उद्योगातून रोजगाराच्या संधी मिळू शकतात.
सरकार दुग्ध व्यवसाय उद्योगात स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना प्रोत्साहन व अनुदान देत आहे. नवीन दूध डेअरी सुरू करण्यासाठी प्रत्येक गोष्टींचे बारकाईने नियोजन करणे महत्त्वाचे आहे. दूध डेअरी व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी त्याचे अर्थकारणही समजून घेणे आवश्यक आहे.

 Dairy Webinar
Animal Care : योग्य प्रजनन, दूध उत्पादनासाठी समतोल आहार महत्त्वाचा

या पार्श्‍वभूमीवर दुग्ध व्यवसायातील करिअर संधी व स्टार्टअप सुरू करण्यासंबंधी मार्गदर्शन करणारा विनामूल्य वेबिनार १० सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता आयोजिला आहे. यामध्ये फलटण येथील ‘गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स’चे सरव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड हे मार्गदर्शन करतील. पदवीधर अशा २१ ते २५ वयोगटातील युवक-युवतींनी यासाठी नावनोंदणी करावी.

नावनोंदणीसाठी क्यूआर कोड :
संपर्क : ७२१९६११३०६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com