कुक्कुटपालन व्यवसाय (poultry farming) यशस्वी करायचा असेल तर, कोंबड्यांचे रोग नियंत्रण (hen disease) करणे महत्त्वाचे आहे. कोंबड्यामध्ये अनेक संसर्गजन्य रोगांचे प्रकार दिसून येतात. कोंबड्यांना विविध रोगांची बाधा होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पक्ष्यांची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती होय. कोंबड्यांच्या काही संसर्गजन्य आजारात कोंबड्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी होते. यामुळे कोंबड्यामध्ये मरतुकीचे (mortality) प्रमाण वाढीस लागते.
हे लक्षात घेऊन रोगांचा प्रसार होण्याआधी वेळेवर लसीकरण (vaccination) करणे आवश्यक आहे. या सोबतच रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या वनस्पतींचा वापर कोंबड्यांच्या दैनंदिन खाद्यात अथवा पिण्याच्या पाण्यात केल्यास त्याचा चांगला फायदा दिसून येतो.
उपयुक्त वनस्पती
अश्वगंधा- या संपूर्ण वनस्पतीचा वापर औषधात केला जातो. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. अश्वगंधा वनस्पती टॉनिक म्हणून काम करते. म्हणून शरीर वाढीसाठी उपयोगाची असते.
तुळस- तुळशीचे पान आणि बी अत्यंत गुणकारी असते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुळशीचा वापर होतो. तुळशीमध्ये जीवाणू, विषाणू व बुरशीविरोधी अनेक गुणधर्म असल्यामुळे संसर्ग काळातदेखील तुळशीचा वापर उपयुक्त ठरतो.
आवळा- आवळ्याचे फळ सुकवून औषधात वापर जाते.
शतावरी- शतावरीची मुळे औषध बनविताना वापरली जातात. शतावरीचा टॉनिक म्हणून देखील वापर उपयुक्त आहे.
औषधी वनस्पतीचा वापर लसीकरण करण्यापूर्वी दोन ते तीन दिवस आगोदर आणि लसीकरणानंतर चार ते पाच दिवस केल्यास फायदा दिसून येतो. ग्रामीण भागात दुसऱ्या गावात किंवा जवळील पोल्ट्री फार्मवर एखाद्या संसर्गजन्य रोगाची बाधा झालेली असल्यास, या वनस्पतीचा वापर करायला सुरुवात करावी. यामुळे आपल्या कोंबड्यांच्या मध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.