Goat Farming: वाढत्या तापमानात चारा, पाणी व्यवस्थापनावर भर

Animal Husbandry: गणेश जाधव, नांदेड जिल्ह्यातील रोही पिंपळगाव तांड्याचे एक यशस्वी शेळीपालक, शेळ्या पाळताना चारा, पाणी आणि आरोग्य व्यवस्थापनावर विशेष भर देतात. उन्हाळ्यात पाण्याची योग्य व्यवस्था आणि आहारातील विविधतेमुळे त्यांचे शेळीपालन यशस्वी झाले आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon
Published on
Updated on

Goat Farming Management:

शेतकरी नियोजन । शेळीपालन

शेतकरी : गणेश जाधव

गाव : रोही पिंपळगाव तांडा, ता. मुदखेड जि. नांदेड

एकूण शेळ्या : ३०

एकूण शेती : ५ एकर

मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव तांडा येथील गणेश नंदू जाधव यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. शेतीला जोड म्हणून पूरक व्यवसाय करण्याचा त्यांनी विचार केला. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे पशुपालन व्यवसाय तज्ज्ञ प्रा. महेश अंभोरे यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन करण्याचा सल्ला दिला. मागील दोन वर्षांपासून त्यांनी शेतीला बंदिस्त शेळीपालनाची जोड देत व्यवसायात चांगलाच जम बसविला आहे. सध्या त्यांच्याकडे लहान-मोठ्या मिळून ३० शेळ्या आहेत. शेळ्यासाठी ५० बाय ७० फूट आकाराचे शेड उभारणी केली आहे.

Goat Farming
Goat Farming : यशस्वी शेळीपालनासाठी कशा शेळ्या निवडाल?

चारा पिकांची लागवड

शेळ्यांना दर्जेदार चारा उपलब्ध होण्यासाठी गणेश जाधव यांनी शेतामध्ये चारा पिकांची लागवड केली आहे. त्यात नेपियर गवत तीस गुंठे, दशरथ घास वीस गुंठे, मका पाच गुंठे, कडवळ एक एकर अशी चारा पिकाची लागवड केली आहे. सोबतच वाळलेला ज्वारीचा कडबा, भुईमूग काड शेळ्यांना खाद्य म्हणून दिले जाते.

खाद्य नियोजन

दररोज सकाळी सहा ते सात या वेळात शेडमधून

शेळ्या बाहेर काढून शेडची स्वच्छता केली जाते. त्यानंतर गहू, ज्वारी, मका, सोयाबीन या धान्याचा भरडा शेळ्यांना दिला जातो. आठ वाजता हिरवा, सुका चारा देतात.

शेळ्यांच्या आहारात खनिज मिश्रणाचा समावेश देखील केला जातो. सुक्या चाऱ्यामध्ये तूर, सोयाबीन व हरभरा कुटार यांचा वापर केला जातो. सायंकाळी चार ते पाच वाजता या दरम्यान हिरवा चारा दिला जातो. शेडमधून लेंडीखत उपलब्ध होते. त्याचा वापर शेतामध्ये केला जातो. त्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत झाल्याचे गणेश जाधव यांनी सांगितले.

Goat Farming
Goat Farming : पोषण व्यवस्थापनातून शेळीपालनात उत्पन्नवाढ शक्य

आरोग्य व्यवस्थापन

बदलत्या वातावरणामुळे शेळ्यांमध्ये विविध आजारांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे शेळ्यांचे आरोग्य बिघडते. शेळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी शेळ्यांची प्रतिकारशक्ती अत्यंत चांगली असणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी आहार व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक लसीकरण आणि शेडच्या स्वच्छतेवर भर दिला जातो.

नियमितपणे तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते.

तीन वर्षातून एकदा पीपीआर लस दिली जाते. जुलै महिन्यात एफएमडी, घटसर्पचे लसीकरण केले जाते.

पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था शेडमध्ये करण्यात आली आहे.

दर तीन महिन्यांनी जंतनाशकाची मात्रा दिली जाते.

उन्हाळ्यातील व्यवस्थापन

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे शेळ्यांच्या शरीरावर ताण येतो. त्याचा विपरीत परिणाम शेळ्यांवर दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्यात शेळ्यांची विशेष काळजी घेतली जाते.

शेडमध्येच चारा आणि पाणी उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. आहारात खनिज मिश्रणाचा नियमितपणे वापर केला जातो. थंड, स्वच्छ आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो. शिवाय शेडमध्ये मॅट टाकण्यात आले आहेत.

वाढत्या तापमानापासून शेळ्यांचे संरक्षण होण्यासाठी शेडच्या बाजूने आणि शेडवर हिरव्या शेडनेटचा वापर करण्यात आलेला आहे.

शेळ्यांच्या उन्हाची तीव्रता जास्त असताना बाहेर चरण्यासाठी नेणे टाळले जाते. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर चरण्यासाठी बाहेर सोडले जाते.

- गणेश जाधव, ९५६१२४८७९४

(शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com