FMD Vaccination : परभणीत ३ लाखांवर जनावरांचे लाळ्या खुरकूत लसीकरण

Animal Care : राष्ट्रीय पशू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ६०३ जनावरांचे लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.
FMD Vaccination
FMD VaccinationAgrowon

Parbhani News : राष्ट्रीय पशू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ६०३ जनावरांचे लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.

मॉन्सूनपूर्व लसीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १ लाख ६० हजार ८० जनावरांचे घटसर्प, फऱ्या तसेच आंत्र विषार रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी नेमाडे यांनी दिली.

लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक मोहीम वर्षातून दोन वेळा राबविण्यात येते. यंदा जिल्ह्यात मार्च एप्रिल महिन्यात ही मोहीम राबविण्यात आली. पशुसंवर्धन विभागांतर्गत परभणी जिल्ह्यातील ८६ पशू वैद्यकीय दवाखान्यांतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत पशुचिकित्सालयाच्या ठिकाणी तसेच गावागावांत जाऊन जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

FMD Vaccination
Animal Care : जंत प्रादुर्भावामुळे जनावरांमध्ये कोणती लक्षणे दिसतात?

जिल्ह्यातील पशुधनाची संख्या ३ लाख ९८ हजार ३५६ होती. एकूण ३ लाख ५८ हजार ६०० लसींचा पुरवठा करण्यात आला. त्यापैकी ३ लाख ४१ हजार ६०३३ जनावरांचे लसीकरण कऱण्यात आले. मॉन्सूनपूर्व लसीकरण मोहिमेअंतर्गत घट सर्प रोग प्रतिबंधक मोहिमअंतर्गंत ७ हजार ६८० जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

FMD Vaccination
Animal Care : कशी दूर कराल कालवडीतील वंधत्वाची समस्या?

घटसर्प व फऱ्या प्रतिबंधक (संयुक्त) लस १ लाख १४ हजार जनावरांना देण्यात आली. आंत्रविषार लस ३८ हजार ४०० जनावरांना देण्यात आली असल्याचे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.

लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण स्थिती

तालुका पशुधन संख्या लसीकरण पूर्ण

परभणी ६८४४३ ५८७३३

जिंतूर ७४३६३ ६४१४४

सेलू ४०८५७ ३४९५७

मानवत २४९४५ २१५४२

पाथरी ३०६२८ २५८१२

सोनपेठ २६७५३ २२८९५

गंगाखेड ४८३३६ ४१३२५

पालम ३३७३५ २८८३३

पूर्णा ५०२९६ ४३३६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com