Lumpy Skin : लम्‍पी स्कीन प्रतिबंधासाठी तपासणी

माथेरानमधील पशुधन विकास, महसूल, पोलिस विभागातील अधिकाऱ्यांनी गोशाळेला भेट देत तपासणी केली. एकाही गायीला लम्‍पी सदृश लक्षणे आढळली नाहीत.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon
Published on
Updated on

माथेरान ः लम्पी रोगासंदर्भात (Lumpy Skin) प्रतिबंध, नियंत्रण व निर्मूलनासाठी शहरातील जनावरांची पाहणी (Animal Inspection) करून आढावा घेण्यात आला. यामध्ये पशुसंवर्धन (Department Of Animal Husbandry), महसूल तसेच पोलिस प्रशासनाचे अधिकारी सहभागी झाले होते. माथेरानमध्ये एकाही गुरांला लम्पी (Lumpy Skin) सदृश लक्षण असून सतर्कता राखण्याबाबत पशुपालकांना सूचना देण्यात आल्‍या आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin Disease : सैन्य-अस्त्राविनाच ‘लम्पी’शी लढाई

माथेरानमधील पशुधन विकास, महसूल, पोलिस विभागातील अधिकाऱ्यांनी गोशाळेला भेट देत तपासणी केली. एकाही गायीला लम्‍पी सदृश लक्षणे आढळली नाहीत. माथेरानमध्ये ४० हून अधिक पाळीव गुरे आहेत. जून महिन्यात गोशाळेतील जनावरे काढून मालकांनी आपल्या गोठ्यात बांधण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील गोवंशीय पशूंची तपासणी केली आहे. एकाही गुराला आजाराची लागण झालेली नाही. मात्र गोपालकांना सुरक्षेबाबत योग्य खबरदारी घेण्याबाबत सूचना केल्‍या आहेत.
डॉ. अमोल कांबळे, पशुधन विकास अधिकारी, माथेरान
माथेरानमध्ये गुरांमध्ये लंपी आजार आढळला नाही. जनावरांचा बाजार, शर्यती, प्रदर्शन आदी कार्यक्रमास प्रतिबंध असून नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास कडक कारवाई करण्यात येईल.
दीक्षांत देशपांडे, महसूल अधीक्षक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com