Poultry Industry in Maharashtra : राज्यस्तरीय कुक्‍कुटपालन समन्वय समितीची स्थापना

पशुखाद्याच्या दरात सातत्याने होणारी वाढ त्यासोबतच रोग व इतर कारणांमुळे पोल्ट्री व्यवसायातील उत्पन्नात चढ-उतार होतात. त्यातच गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे परिस्थिती आणखीच विदारक झाली होती.
Poultry
PoultryAgrowon

नागपूर ः राज्यात बॉयलर तसेच लेअर पोल्ट्री व्यवसाय (Poultry Industry) विविध कारणांमुळे अडचणीत आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासकीय पातळीवर या समस्यांवर मंथन व्हावे याकरीता राज्यस्तरीय कुक्‍कुटपालन (Poultry Farming) समन्वय समितीची स्थापना शासनस्तरावरून करण्यात आली आहे. विदर्भातील दोघा शेतकऱ्यांचा या समितीवर समावेश आहे.

Poultry
Poultry Industry in Maharashtra: राज्यस्तरीय कुक्‍कुटपालन समन्वय समिती अंतिम टप्प्यात

पशुखाद्याच्या दरात सातत्याने होणारी वाढ त्यासोबतच रोग व इतर कारणांमुळे पोल्ट्री व्यवसायातील उत्पन्नात चढ-उतार होतात. त्यातच गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे परिस्थिती आणखीच विदारक झाली होती.

या साऱ्याचा फटका असह्य झाल्याने राज्यात तीन पोल्ट्री व्यावसायिकांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांच्या समस्यांची जाणीव ठेवत त्याच्या निराकरणासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत होती.

Poultry
Poultry Diseases: कोंबड्यांतील रोगप्रसार कसा रोखायचा?

समस्या जाणून घेण्यासाठी एक राज्यस्तरीय समिती स्थापन करावी, अशी मागणी अमरावती पोल्ट्री असोसिएशनकडून केली जात होती. शुभम महल्ले, अतुल पेरसपूरे यांनी ती शासनस्तरावर रेटली. त्याच्याच परिणामी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेत पुण्यात एक बैठक घेण्यात आली.

या बैठकीत झालेल्या चर्चेतही राज्यस्तरीय समन्वय समितीचा मुद्दाच अजेंड्यावर होता. अखेरीस शासनस्तरावरून या समितीला मान्यता देण्यात आली आहे. त्या संदर्भातील शासन आदेशही निर्गमित करण्यात आला आहे.

या समितीमध्ये पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नगर जिल्ह्याला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. विदर्भात अमरावती व नागपूर हे जिल्हे पोल्ट्री व्यवसायात नावारूपास आले आहेत. यातील केवळ अमरावतीलाच प्रतिनिधित्व देण्यात आल्याने हा दुजाभाव असल्याचा आरोप होत आहे.

समितीवर यांचा आहे समावेश...

अनिल खामकर (रायगड), धनंजय आहेर (राहाता, नगर), भाऊसाहेब ढोरे (खेड, पुणे), एकनाथ मुंगरसे (संगमनेर, नगर), अतुल पेरसपूरे (चांदूर रेल्वे, अमरावती), इकबाल बादशाह अत्तार (रहिमतपूर, सातारा), रवींद्र मेटकर (अमरावती), सुदर्शन पोकळे (लोहारे, नगर), रोहित सहाणे (तळेगाव मावळ, पुणे), जॉन डिकोस्टा (विक्रमगड, पालघर), शंकर राव (मान जवळगाव, जालना), संजय नळगीरकर (औरंगाबाद), अजय देशपांडे (पुणे), योगेश खटावकर (नाशिक), डॉ. प्रसन्न पेडगावकर (वेंकटेश्‍वरा हॅचरीज, पुणे), वसंत कुमार शेट्टी (सांगली), श्‍याम भगत (एनईसीसी, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com